Online Fraud Saam tv
महाराष्ट्र

Online Fraud : ऑनलाइन बटाटे खरेदी करून सव्वादोन लाखात फसवणूक; सायबर पोलिसांनी तरुणास घेतले ताब्यात

Beed News : सातारा जिल्ह्यातील फलटन येथील एका तरुणाने बटाटे खरेदी करायचे असल्याची जाहिरात सोशल मोडियावर टाकली होती.

विनोद जिरे

बीड : सोशल मीडियावर टाकलेली जाहिरात पाहून व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. एका (Beed) तरुणाने बटाटे खरेदी करून त्याचा मोबदला दिला नाही. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून सायबर पोलिसांनी (Cyber Police) सदर तरुणास ताब्यात घेतले आहे. (Live marathi News)

सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटन येथील एका तरुणाने बटाटे खरेदी करायचे असल्याची जाहिरात सोशल मोडियावर टाकली होती. ती पाहून बीड येथील एका बटाटा व्यापाऱ्याने त्याच्याशी संपर्क साधत तब्बल १२ टन बटाटे त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पाठवले. परंतु यानंतर या तरुणाने पैसे देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक (fraud) झाल्याचे लक्षात येतात संबंधित व्यापाऱ्याने बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तरुणास घेतले ताब्यात 

सायबर पोलिसांकडून सदर प्रकरणाचा तपास करत तरुणाचा शोध घेत या तरुणास अटक केली. अशाच पद्धतीने त्याने इतर काही ठिकाणीही फसवणूक केल्याचे आता समोर येत आहे. दरम्यान याविषयीचा अधिक चौकशी पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अकोला-खंडवा रेल्वेमार्गामुळे खरीप बुडाला; रेल्वेच्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

Pune News: बांधकाम व्यावसायिक आत्महत्या प्रकरण; शिंदे गटातील बडा नेता आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल

दैनिक राशिभविष्य... मेष, कर्क ते वृश्चिक, मीन...१२ राशींसाठी कसा असेल शुक्रवार? तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनात उद्धव ठाकरे, २० जुलैला दिल्लीत जाणार, VIDEO

Mira Road Accident: मुंबईमधील बांधकाम साईटवर भीषण अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, अनेक वाहनांचा चुराडा

SCROLL FOR NEXT