Manoj Jarange Patil Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ; शिरूर पोलिसांनी बजावली नोटीस, बीडमध्ये ९ गुन्हे दाखल

Beed News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु आहे. मध्यंतरी जरांगे पाटील हे राज्यभर दौरा करत फिरले. या दरम्यान त्यांनी काही दिवसांपूर्वी बीडमध्ये दौरा केला

विनोद जिरे

बीड : मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. (Beed) कारण जरंगे पाटील यांच्या विरोधात बीडमध्ये आतापर्यंत ९ गुन्हे दाखल झाले असून (Shirur) शिरूर पोलिसांनी देखील नोटीस बजावली आहे. (Live Marathi News)

मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarkshan) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा लढा सुरु आहे. मध्यंतरी मनोज जरांगे पाटील हे राज्यभर दौरा करत त्यांनी आरक्षणाच्या अनुषंगाने सभा घेतल्या. या दरम्यान त्यांनी काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये जरांगे पाटील यांच्यावर आतापर्यंत ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर शिरूर पोलिसांनी (Police) गुन्हा प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांना नोटीस देखील बजावली होती. परंतु ती परत आली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सभेतील जेसीबीवर देखील कारवाईचे संकेत

दरम्यान बीडमध्ये मनोज जरांगे पाटील हे दौऱ्यावर आले असताना त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. याकरिता जेसीबी आणि क्रेनचा वापर करण्यात आला होता. यामुळे बीड पोलिसांनी (Beed Police) आता या जेसीबी व क्रेन चालकाविरोधात दंडात्मक कारवाई करत दंड ठोटावला असून आता यापूर्वी बीडमध्ये झालेल्या इशारा सभेमध्ये वापरण्यात आलेल्या जेसीबीची देखील माहिती घेतली जात आहे. यानंतर त्यांच्यावर देखील कारवाईचे संकेत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT