Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Latest News  Saam Tv
महाराष्ट्र

Manoj jarange Patil: 'मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी भुजबळांची चौकशी करावी अन्यथा...' जरांगे पाटलांचा इशारा

Manoj jarange Patil Vs Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना मंत्री पदावरून हटवून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

विनोद जिरे

Manoj jarange Patil Press Conference:

शनिवारी (१३, जानेवारी) बीडमध्ये ओबीसी एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यातून ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोर जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. मराठा आंदोलनादरम्यान बीडमध्ये झालेल्या जाळपोळीमागे जरांगे पाटलांचा हात असल्याचा गंभीर आरोप भुजबळांनी या सभेमधून केला होता. या आरोपांवर आता जरांगे पाटील यांनीही सडेतोड उत्तर देत पुन्हा एकदा भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

"भुजबळांना मंत्री पदावरून हटवून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. पिस्तुलाची भाषा बोलून भुजबळ मराठा आंदोलकांना बदनाम करत आहेत.. त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी त्यांची चौकशी करावी अन्यथा ते दोघेही टारगेटवर असतील," असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

नादी लागायच नाही..

"भुजबळ लईच येडे आहेत. कधी शहाणे होतील काय माहिती. पुढच्या वेळी भुजबळ यांना मंत्रीपद देणार नाहीत त्यामुळे गरज नाही असं म्हणतात बोलत आहेत, आता त्यांच्या नादी लागायचं नाही," अशी टीकाही जरांगे पाटील यांनी यावेळी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईला जाताना गनिमी कावा...

"भुजबळ गरिबावर अन्याय करण्यासाठी मंत्री पदाचा वापर करत आहेत. कायदा पायदळी तुडवत आहे.दंगली घडवण्याची भाषा बोलली जात आहे. नोटीसिला आम्ही घाबरत नाही, आम्ही मुंबईला जाताना गनिमी कावा करणार आहोत, भुजबळांनी पिस्तूल विकायचा धंदा टाकला का? बीड मधील जाळपोळीचे नंबर कसे माहित झाले?" असा सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

बदनामी करणारे शोधुन काढणारं...

"मराठ्यांचा गनिमी कावा कसा असतो हे मुंबईत पहा, त्यांनी कितीही 144 लावले तरी मराठा समाज मुंबईमध्ये येणारचं. आरक्षण मिळाल्यानंतर आमच्या लोकांना बदनाम करणारे कोण आहेत हे शोधून काढणार आहे," असा इशाराही जरांगेंनी दिला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT