Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed : बीडमधील जलदुत! बायकोच्या अंगावरचे सोनं विकून गावकऱ्यांची तहान भागवतोय

Beed News : बायकोच्या अंगावरील सोनं विकून बोरवेल केली आणि या बोरवेलला इतकं पाणी लागलं की एका गावासह पाच गावाची ताण देखील या बोरवेलवर भागवली जात आहे. मात्र कालांतराने या बोरचंही पाणी कमी पडू लागले

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: बीड जिल्हा म्हटलं की दुष्काळ अवकाळी, गारपीट या सगळ्या गोष्टींनी त्रासलेला. यातच उन्हाळा म्हटलं की शेतकऱ्यासह अनेक खेड्यापाड्यातील वाडीवस्तीवरील लोकांच्या अंगावर काटा येतो. पाण्यासाठी मैलोन मैल भटकंती करावी लागते. यातच जरूड गाव आणि त्या बाजूचे पाच गाव हे नेहमीच होरपळताना पाहायला मिळतात. गेल्या वर्षीही असाच प्रसंग एका तरुणाने पाहिला. पायपीट करून देखील पाणी मिळत नाही, हि पायपीट तरुणाला बघवली नाही. यासाठी त्याने थेट आपल्या पत्नीचे सोन्याचे दागिने मोडले आणि बनला एका गावात सह पाच गावांचा जलदूत.

बीडपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेलय जरूड गावातील राजेश काकडे असे या गावची तहान भागविणाऱ्या तरुणाचे नाव आहे. गावाची तहान भागवण्यासाठी याने थेट आपल्या बायकोच्या अंगावरील सोनं विकून बोरवेल केली आणि या बोरवेलला इतकं पाणी लागलं की एका गावासह पाच गावाची ताण देखील या बोरवेलवर भागवली जात आहे. मात्र कालांतराने या बोरचंही पाणी कमी पडू लागले. त्यात त्याने अजून एक बोअर करून पंचक्रोशीतील गावांना पाणी द्यायचा संकल्प केला. या संकल्प मुळे उन्हाळ्यात आता जवळपास अनेक गावांची तहान भागते आहे. 

डाळींब, मोसंबीच्या बागांनाही दिले नाही पाणी 
राजेश काकडे हा स्वतःची बाजरी, डाळिंब आणि मोसंबीचं पीक हे वाया जाऊ दिलं. कारण गावाला पाणी देण्यासाठी त्यांनी शेतातील पिकांना पाणी दिलंच नाही. यामुळे हे पूर्ण शेती आणि लाखोंचा खर्च मातीमोल झाला. नुकसान होत असताना देखील त्याने याचा विचार न करता आपला संकल्प अविरत पार पाडत राहिला. यामुळे जरूर गावातील सरपंचासह नागरिकांनी त्याचा कौतुक तर केलंच आहे मात्र त्याला जलदूत अशी उपाधी देखील दिली आहे.

कोणाकडूनही आर्थिक मदत नाही 
खरंतर पाणी वाटपासाठी केलेला बोअर आजही चालतोय. त्यासोबत अजून एक बोअर गावकऱ्यांसाठी आणि पंचक्रोशीतील येणाऱ्या नागरिकांसाठी त्यांनी घेतला आहे. मात्र यामध्ये कोणाचीही आर्थिक मदत न घेता हा संकल्प राजेशने पूर्ण करून दाखवला आहे. गेल्या उन्हाळ्यापासून ते या उन्हाळ्यापर्यंत या बोअरमुळे गावकऱ्यांसह अनेक परिसरातील नागरिकांना साथ दिली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

Hardik Pandya: मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्यामध्ये बिनसलं? काय आहे नेमकं सत्य, वाचा

पेट्रोल-डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका; मोदींच्या आवाहनावर महाराष्ट्राचा कौल काय? मुंबई-पुण्यासह, नागपूरकरांची भूमिका स्पष्ट

Shani Jayanti 2026: शनी जयंतीला होणार बुध-शुक्राचं गोचर; या राशींना मिळणार पैसाच पैसा

मुलीच्या हळदीत वडिलाचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; लग्न घरावर कोसळला दुःखाचा डोंगर

SCROLL FOR NEXT