Majalgaon Dam Saam tv
महाराष्ट्र

Majalgaon Dam : माजलगाव धरणाची पाणी पातळी २ सेंमीने वाढली; अवकाळी पावसाने दिलासा

Beed News : गत दोन दिवसात धरणाच्या पाणी पातळीत २ सेंटिमीटरची वाढ झाली. दोन दिवसांपूर्वी धरणात ४२६.३३ मीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामध्ये वाढ झाल्याने शुक्रवारी धरणाची पाणीपातळी ४२६.३५ मीटर एवढी

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे एकीकडे प्रचंड नुकसानीची झळ बसलेली पाहण्यास मिळत आहे. तर दुसरीकडे दिलासा मिळाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. कारण मागील वीस- पंचवीस दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पाणी टंचाईची समस्या काहीशी कमी झाली आहे. यात बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणाची पाणी पातळी २ सेंटीमीटरने वाढली आहे.

राज्यात अवकाळी पाऊस होत आहे. तर आठवडाभरापासून बीड जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला. माजलगाव धरण परिसराच्या क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने गत दोन दिवसात धरणाच्या पाणी पातळीत २ सेंटिमीटरची वाढ झाली. दोन दिवसांपूर्वी धरणात ४२६.३३ मीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामध्ये वाढ झाल्याने शुक्रवारी धरणाची पाणीपातळी ४२६.३५ मीटर एवढी झाली होती.

४० वर्षाच्या इतिहासात मे महिन्यात प्रथमच पाणीपातळी वाढली 

मागील चार दिवसांपासून बीड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे माजलगाव धरणातील पाणीपातळी २ सेंटीमीटरने वाढली. माजलगाव धरणाच्या चाळीस वर्षाच्या इतिहासात अवकाळी पावसामुळे मे महिन्यात प्रथमच पाणी पातळीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले. या पावसामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

पाणी टंचाईची समस्या काहीशी मिटली 

दरम्यान चार वर्षांपूर्वी अवकाळी पावसामुळे जूनमध्ये माजलगाव धरणात २ सेंटिमीटरने पाणी पातळीत अशीच वाढ झाली होती. त्यावेळी धरणात उपयुक्त पाणीसाठा १५०.५० दलघमी एवढा होता तर पाणी पातळी ८.५० टक्के एवढी होती. यावर्षी मे महिन्यातच हि वाढ झाली आहे. दरम्यान एप्रिल महिन्यात जाणविणारी पाणीटंचाईची भीषणता वाढण्याची शक्यता होती. मात्र मे महिन्याच्या सुरवातीपासून होत असलेल्या अवकाळीमुळे पाणीटंचाईची समस्या काहीशी मिटली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1947 Grocery Price: साखर, मीठ, तेल आणि सोनं...१९४७ मध्ये 'या' गोष्टींची किंमत किती होती?

Maharashtra Live Update: अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीला रात्री करा हे ५ उपाय, घरात नांदेल सुख- शांती

मालेगावात मटण-चिकन शॉप बंद, पालिकेच्या आदेशाचं कडेकोट पालन, VIDEO

Shocking : धक्कादायक! ड्रेनेज लाइनमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT