Beed Land Scam Saam tv
महाराष्ट्र

Beed Land Scam: जमीन घोटाळा; अतिक्रमणे, परस्पर हस्तांतर प्रकरणी समिती गठीत

जमीन घोटाळा; अतिक्रमणे, परस्पर हस्तांतर प्रकरणी समिती गठीत

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यातील देवस्थान जमीन घोटाळा आणि अतिक्रमण प्रकरणात आता समिती गठीत करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशाने जिल्ह्यातील हिंदू देवस्थान जमिनीची (Beed News) माहिती गोळा करणे, अतिक्रमणे व अवैधरीत्या हस्तांतरण झाले असल्यास कारवाई करावी. यासह इतर कामांसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी, बीड व अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई हे समितीचे अध्यक्ष असणार आहेत. सर्व माहिती संकलित करून ३० एप्रिलपूर्वी कारवाई करावी; असा आदेश आयुक्तांनी समितीला दिला आहे. त्यामुळे देवस्थान जमिनी घोटाळा प्रकरणातील (Land Scam Case) भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. (Breaking Marathi News)

१९५९ पासून सात- बारा, क, ड पत्रक, खासरा पत्रक, पाहणी पत्रक व इनाम जमिनीच्या नोंदवहीमधील नोंदी तपासून हिंदू देवस्थानाची माहिती संकलित करावी. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर करण्यात आलेल्या इनाम जमिनीचा डाटाबेसमध्ये गाव नमुना ९ मध्ये समाविष्ट असलेल्या हिंदू देवस्थान इनाम जमिनीचा समावेश करण्यात आला असल्याची खात्री करावी. हिंदू देवस्थान इनाम जमिनीचे जूने अभिलेख उपलब्ध करून देण्यात यावेत. त्यामध्ये खासरा पत्रक, पाहणी पत्रक, गाव नमुना 9 सात-बारा, राजपत्र, मुंतखब, जमिनीशी संबंधित फेर, नवीन सात-बारा व इतर कागदपत्रे, अस्तित्वात असलेल्या सर्व हिंदू देवस्थान इनाम मालमत्ता, प्रत्यक्षात ताब्यात असलेल्या व्यक्ती, संस्थाचा तपशील द्यावा. सदरचा ताबा कायदेशीर आहे किवा कसे हे पहावे.

तसेच संबंधित इनाम मालमत्ता अतिक्रमणाखाली आहेत किंवा कसे याबाबींची देखील नोंद घेऊन अतिक्रमणे व अवैधरीत्या हस्तांतरण झाले असल्यास कारवाई करावी. देवस्थान इनाम मालमत्तेमध्ये सात- बारा उताच्यावर मालकी हक्कात केवळ संबंधित संस्थेचे किंवा देवस्थानचे नाव व प्रतिबंधित सत्ता प्रकार अशी नोंद असल्यास त्याबाबतची तपासणी करून अवैधरीत्या खासगी इसमांची नावे नियमानुसार कार्यवाही करून काढून टाकावीत. अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies: काळेभोर आणि दाट केसांसाठी एकदा ट्राय करा 'हे' उपाय

Onion Crop : धुक्यामुळे कांदा पिक धोक्यात; रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल

VBA News : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध! पाहा नेमकं काय आहे जाहीरनाम्यात | Video

Sneeze: शिंकताना डोळे का बंद होतात? जाणून घ्या एका क्लिकवर

Crime News : ३-३ गर्लफ्रेंड, महागडं गिफ्ट द्यायचं होतं; पठ्ठ्या थेट बँक लुटायला गेला, पण सगळा घोळ झाला!

SCROLL FOR NEXT