Godavari River Flood Saam tv
महाराष्ट्र

Godavari River Flood : गोदावरी नदीला पूर; गंगामसला गावात पुराचे पाणी, मोरेश्वर मंदिर पाण्याखाली

Beed Majalgaon Heavy Rains: गोदावरी नदीला पूर आला असल्याने गोदाकाठावर असलेल्या गंगामसला गावाला प्रशासनाचा सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. आता देखील गावातील काही भाग पाण्याखाली गेला आहे. याठिकाणी प्रशासन लक्ष ठेवून आहे.

Rajesh Sonwane

योगेश काशीद 

बीड : बीड जिल्ह्यात चार- पाच दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. नदीला आलेल्या पुराचे पाणी माजलगाव तालुक्यातील गंगामसला गावात देखील शिरले असून गावातील मोरेश्वर मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे. तसेच गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

बीड जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. जोरदार पावसामुळे नदी नाल्यांसह तलाव भरगच्च भरले आहेत. नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली गेले असून गंगामसला येथील गावकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.  

मंदिर पाण्याखाली 

गोदावरी नदीला पूर आल्याने कुठल्याही क्षणी गावांमध्ये पाणी घुसू शकते; अशी स्थिती निर्माण झाली आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथे झाले असून गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे पुराचे पाणी गावामध्ये शिरले असून गावांमधील मोरेश्वर मंदिर पाहण्यासाठी गेले आहे. याचा फटका गंगामसला येथील शेती पिकांना बसला आहे.

शेती पिकांचे मोठे नुकसान 

बीड, माजलगाव, परळी, वडवणी, गेवराई, आंबेजोगाई व आष्टी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाचा पाचव्या दिवशीही धुमाकूळ शेतकऱ्यांच्या कपाशी पिकासह सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात नुकसान शेतामध्ये तलावाचे स्वरूप आले आहे. तसेच नदीचे पाणी शेतामध्ये शिरल्याने आणि जोरदार पावसामुळे बीडच्या माजलगाव तालुक्यातील गंगामसला, आडोळा त्याचबरोबर बीड तालुक्यातही साक्षाळ, पिंपरी नाव, गणराजुरी त्याचबरोबर परळी तालुक्यात बऱ्याच ठिकाणी शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: रायगड जिल्ह्यात घरावर दरड कोसळून महिलेचा मृत्यू

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास कोलेस्ट्रॉल कमी होतं?

रेल्वे प्रवाशांनो, हा व्हिडिओ बघाच! कुठे-कुठे ट्रॅकवर साचलंय पाणी? | VIDEO

Badlapur Heavy Rain : बदलापूरात सकाळपासून ३८ मिलिमीटर पाऊस; सखल भागात शिरले पाणी, शनीनगरातील लोखंडी पूल वाहिला

Jacqueline Fernandez: 'परी म्हणू की सुंदरा', जॅकलिनच्या सौंदर्याने केले घायाळ

SCROLL FOR NEXT