Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: हृदयद्रावक! झोक्याने केला घात; खेळताना चिमुकलीचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

हृदयद्रावक! साडीने बांधलेल्या झोक्याने केला घात; खेळताना चिमुकलीचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

विनोद जिरे

बीड : उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आपल्या मामाच्या घरी आलेल्या चिमुकलीचा साडीने बांधलेल्या झोक्याला गळफास लागून (Death) मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना (Beed) बीडपासून जवळच असणाऱ्या मोची पिंपळगाव गावात घडली. वैष्णवी गणेश कातखडे (रा. गोमळवाडा ता. शिरूर कासार) असे मयत चिमुकलीचे नाव आहे. (Tajya Batmya)

गोमळवाडा (ता. शिरूर) येथील रहिवासी गणेश कातखडे यांची मुलगी वैष्णवी हिच्या शाळेला सुटी लागली होती. यामुळे सुटीत बीड तालुक्यातील मोची पिंपळगाव येथे मामाच्या गावाला गेली होती. मामाने तिच्यासाठी घरासमोरील अंगणात साडीचा झोका बांधला होता. दरम्यान वैष्णवी झोके घेत असताना साडीला पिळ बसला आणि तिचा गळा आवळला गेला. यामध्ये तिचा श्वास गुदमरला आणि यातच तिचा मृत्यू झाला. आपली मुलगी मृत्युमुखी पडल्याचे कळताच वैष्णवीच्या आईने हंबरडा फोडला.

कुटुंबाला बसला धक्‍का

वैष्णवी ही मानूरकर महाराज इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. आता ती दुसरीतून तिसरीत गेली होती. वैष्णवीला एक लहान बहीण असून ती शाळेसह घराला आणि गावालाही चटका लावून गेल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

४ मुली, १ मुलगा अन् गेस्ट हाऊसमधला तो रूम...पोलिसांची अचानक धाड पडताच उडाली खळबळ; आक्षेपार्ह साहित्य जप्त

Cloves-Garlic Benefits : रोज खा लवंग-लसूण; हृदयासह मेंदूही राहील तंदुरुस्त, ७ जबरदस्त फायदे वाचाच

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

8th Pay Commission: पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात होणार हे 6 मोठे बदल

Accident News : मुंबई बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात! वाहनांच्या जोरदार धडकेत २ जणांचा मृत्यू; १२ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT