beed Crime Saam tv
महाराष्ट्र

Beed News : हरणाची शिकार करणारे चारजण ताब्यात; बीडच्या केज तालुक्यात मोठी कारवाई

Beed News : बीडच्या केज तालुक्यात वरपगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे.

विनोद जिरे

बीड : वन्य प्राण्यांची शिकार करणे कायद्याने गुन्हा आहे. तरी देखील हरणाची शिकार करू मांस विक्री केली जात असल्याचा प्रकार बीड जिल्ह्यात समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत चार जणांना ताब्यात घेतले आहे.  

बीडच्या (Beed) केज तालुक्यात वरपगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. हरणाची शिकार केल्याची माहिती पोलिसांना (Police) मिळाल्यानंतर पोलिसांनी हि कारवाई केली आहे. या कारवाईत हरणाची शिकार करून त्याच्या मासांची वाटणी करत असताना चौघांना रंगेहाथ ताब्यात घेत त्यांना अटक केली आहे. भैय्या बन्सी पवार, सुनिल ज्ञानोबा पवार, लाला शहाजी शिंदे असं तीन आरोपींचे नाव असून एक अल्पवयीन आरोपी मुलगा आहे. 

दरम्यान या प्रकरणी बीडच्या केज पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भैय्या बन्सी पवार, सुनिल ज्ञानोबा पवार, लाला शहाजी शिंदे आणि एक अल्पवयीन आरोपी यांच्यावर वन्य जीव प्राणी संरक्षण कायदा अधिनियम 1972 चे कलम 3, 49, 50, 51 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT