Beed News Farmer Son Ended Life journey in dharur taluka bhopa village Saam TV
महाराष्ट्र

Beed News: पावसाअभावी उभं पीक करपलं, वडिलांनी घेतलेलं कर्ज कसं फेडायचं? नैराश्यातून तरुणाचं टोकाचं पाऊल

विनोद जिरे

Beed Farmer Son Ended Life: गेल्या महिनाभरापासून राज्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिके करपून चालली आहे. दुबार पेरणी करून सुद्धा पावसाने दिलासा दिला नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीसाठी घेतलेलं कर्ज कसं फेडायचं? असा प्रश्न शेतकऱ्यांसह त्यांच्या कुटुंबांना पडला आहे. याच विवेचनेतून बीडमधील एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे.  (Latest Marathi News)

शेतातील उभी पिकं करपली, मग आपल्या शेतकरी बापाने (Farmer) घेतलेले कर्ज कसं फेडायचं ? त्यात आपल्यावर बेरोजगारीचे संकट, या विवंचनेतून एका २५ वर्षीय शेतकरी पुत्राने स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून आपली जीवनयात्रा संपवली आहे.

बीड जिल्ह्यातील (Beed News) धारूर तालुक्यातील भोपा गावात गुरुवारी (७ सप्टेंबर) दुपारसच्या सुमारास ही घटना घडली आहे. किरण पांडुरंग वाघचौरे (वय २५ वर्ष) असं आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे.

वडिलांवर असलेलं बँकेचं कर्ज आणि बेरोजगारीपणाला कंटाळून किरणने आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्याच्या अचानक निघून जाण्याने वाघचौरे कुटुंबियांसह भोपा गावात गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत किरणचे वडील पांडुरंग वाघचौरे यांच्यावर तेलगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज होते. गेल्यावर्षी अवकाळीमुळे पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं होतं.

हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने पांडुरंग वाघचौरे यांना कर्ज फेडणं कठीण झालं. त्यात यावर्षी पावसाने बीड जिल्ह्याकडे पाठ फिरवली. दुबार पेरणी करून सुद्धा पावसाने पाठ फिरवल्याने वाघचौरे कुटुंबिय आर्थिक संकटात सापडले.

अशातच वडिलांवर झालेला कर्जाचा डोंगर कसा फेडायचा, आपण बेरोजगार आहोत, याची चिंता किरणला लागली होती. याच चिंतेतून किरणने स्वत:ला विषारी इंजेक्शन टोचून घेतलं. दरम्यान याप्रकरणी दिंदूड पोलिस ठाण्यात मृत्यूची आकस्मिक नोंद करण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT