Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : बीडकरांना दिलासा..डोकेवाडा प्रकल्प ओव्हरफ्लो; मांजरा व माजलगाव धरण भरण्यासाठी पावसाची प्रतिक्षा

Beed News : बीड जिल्ह्यात मागील दिवस चांगला पाऊस झाला. यानंतर पावसाने ओढ दिली होती. यानंतर जिल्ह्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली

Rajesh Sonwane

बीड : मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. यानंतर बीड जिल्ह्यात आठ दिवसानंतर दमदार पाऊस हजेरी लावली आहे. यामुळे लघु व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरु लागले आहेत. यात बीडजवळील डोकेवाडा प्रकल्प तुडूंब भरून ओव्हरफ्लो झाला असून ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. 

बीड (Beed) जिल्ह्यात मागील दिवस चांगला पाऊस झाला. यानंतर पावसाने ओढ दिली होती. यानंतर जिल्ह्यातील काही भागात पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली. यामुळे बीड शहराजवळील  डोकेवाडा प्रकल्प तुडुंब भरून वाहत आहे. यामुळे बीडकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान डोकेवाडा प्रकल्प भरल्याने भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी जलपुजन केले आहे. या तलावातील पाणी आता पुढे बिंदुसरा प्रकल्पात पोहचत असल्याने तो प्रकल्पही लवकरच भरण्याची शक्यता आहे. 

एकीकडे पावसामुळे डोकेवाडा प्रकल्प भरून वाहत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील महत्त्वाचा असलेल्या माजलगाव व मांजरा तलावातील (Manjra Dam) पाणीसाठा अद्याप कमीच आहे. यामुळे हे तलाव फुल्ल भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. दरम्यान परतीच्या पावसात यातील पाणीसाठा वाढू शकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

आरसीबीच्या विजयानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; पॉइंट टेबलमध्येही मोठा उलटफेर

Monday Horoscope: पैशाच्या समस्या कमी होतील, ५ राशींसाठी भरभराटीचा दिवस; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT