Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed : दिवाळीत गोरगरिबांना किडे, बुरशीयुक्त तांदूळाचे वाटप; बीड तालुक्यातील संतापजनक प्रकार

Beed News : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कुठलेही धान्य आम्ही तपासून देत नाही. जो तांदूळ खराब आहे; तो नागरिकांनी परत द्यावा. त्यांना आम्ही बदलून देऊ अशी प्रतिक्रिया दिली

Rajesh Sonwane

बीड : दिवाळीच्या अनुषंगाने रेशन कार्ड धारकांना रेशनच्या धान्याचे वाटप करण्यात आले. मात्र नागरिकांना दिवाळीत पुरवठा विभागाने सडलेला तांदूळ दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वाटप करण्यात आलेल्या तांदळात किडे, अळ्या आणि बुरशी लागलेला हा तांदूळ आहे. शिवाय ज्वारीचे वाटप करण्यात आलेलीच नाही. 

बीड तालुक्यात हा धक्कादायक व संतापजनक प्रकार समोर आला आहे. रेशन धान्य लाभार्थ्यांना दर महिन्याला मोफत धान्याचे वाटप करण्यात येत असते. त्यानुसार दिवाळीच्या अनुषंगाने धान्य वाटप करण्यात आले आहे. मात्र यावेळी वाटप करण्यात आलेले धान्य खराब असल्याची ओरड होत आहे. ऐन दिवाळीच्या सणात पुरवठा अधिकारी सुपेकर यांनी तांदूळ चेक न करता बीड तालुक्यातील नागरिकांना वाटप करण्यात आला आहे. 

सडलेला तांदूळ वाटप, ज्वारी मिळालीच नाही 

रेशन धान्य वाटप करतात लाभार्थ्याला ५ किलो तांदूळ आणि ५ किलो गहु वाटप केले जात आहे‌त. तर ज्वारी मात्र देण्यात येत नाही. शेकडो रेशन दुकानावर पुरवठा विभागाने पाठवलेला तांदूळ पूर्णपणे सडलेला, किडे, आळ्या आणि निकृष्ट दर्जाचा आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तर अतिवृष्टीने झोडपलेल्या बीड तालुक्यातील नागरिकांची प्रशासनाने अशा पद्धतीने चेष्टा केली आहे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. 

कारवाईची मागणी 

दरम्यान पुरवठा केलेला तांदूळ आरोग्यासाठी धोकादायक आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कुठलेही धान्य आम्ही तपासून देत नाही. जो तांदूळ खराब आहे; तो नागरिकांनी परत द्यावा. त्यांना आम्ही बदलून देऊ अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Update : मान्सून लांबणीवर, पण राज्यात आज वादळी पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

IPL फायनल हरल्यानंतर गुजरात टायटन्ससोबत मोठी दुर्घटना; भररस्त्यात टीमच्या बसला लागली आग, उडाली एकच खळबळ

MLC Election : ठाण्यात एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, विश्वासू उमेदवाराला मैदानात उतरवले

Vasai-Virar Tourism : रिमझिम पावसात समुद्रकिनारी चिंब भिजा, हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात वसईत लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT