Dhangar Reservation: Dhangar Community March on Beed's Collector Office Saam tv
महाराष्ट्र

Dhangar Reservation: तर मुंबईमध्ये आंदोलन; आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Beed Dhangar Samaj News: धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र यावर सरकारकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.

विनोद जिरे

Beed News:

आरक्षणासाठी धनगर समाजाचा देखील लढा सुरु आहे. दरम्यान आज धनगर समाजाला आरक्षण मिळावे; यासाठी (Beed) बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर यशवंत सेनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. (Live Marathi News)

धनगर समाजाला (Dhangar Reservation) एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र यावर सरकारकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी एका समितीची देखील स्थापना करण्यात आली होती. मात्र ही समिती आता पाकिस्तानात गेली आहे का? असा सवाल आंदोलन करणाऱ्या धनगर समाज बांधवांनी उपस्थित केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर मुख्यमंत्री, उपमुख्यामंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन 

धनगर समाजाकडून अनेक वेळा आंदोलन, मोर्चा काढून देखील धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने समाज आक्रमक झाला असून तात्काळ आरक्षणाचा प्रश्न मार्गी नाही लागला, तर मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा यशवंत सेनेचे अध्यक्ष भारत सोन्नर यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT