Dhananjay Munde Saam tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde News: बीडमधील जाळपोळ, हिंसाचाराच्या घटनेमागे मोठे षडयंत्र; धनंजय मुंडे

Beed News : जाळपोळीच्या घटना दिवशी पोलिसांची इटेलिजन्स कमी पडले, अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यातील जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना संदर्भात खूप मोठे (Beed) षडयंत्र आहे. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे घर पेटवल्यानंतर आता परळीची बारी असं म्हणत माझ्याही घरावरती पेटवण्याची भाषा बोलली गेल्याचा धक्कादायक (Dhananjay Munde) खुलासा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केला. (Tajya Batmya)

मंत्री धनंजय मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यातील जाळपोळ झालेल्या घटनांच्या ठिकाणांची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. बीड जिल्ह्यातील या संपूर्ण घटनांची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे एसआयटी स्थापन करण्याची मागणी करणार. जाळपोळीच्या घटना दिवशी पोलिसांची इटेलिजन्स कमी पडले, अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घराला नंबर देऊन हल्ला 
बीडमध्ये ठराविक ठिकाणावर जाणून बुजून हल्ले केले. हल्ले करायचे होते, त्या घराला नंबर दिला होता. हे फार मोठे षडयंत्र आहे. नेत्यांची कार्यालय, घर आणि संस्था, ऑफिसमध्ये जाळपोळ आणि दगडफेक ठरवून कार्यक्रम केला आहे. हे आजच्या पाहणीत लक्षात आले. अचानक घटना झाल्याने पोलीस हतबल होते. या घटनेचा तपास आणि जबाबदार असतील यांना शिक्षा झाली पाहिजे, ही सर्वांची मागणी आहे. गुजर, जाट आंदोलनात असे नव्हते. मंगळवारी मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्री यांची भेट घेवून एसआयटी स्थापना करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT