बीड : बीडच्या धारूर येथील देवस्थान व इनामी जमीन घोटाळा समोर आला आहे. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा. या मागणीसाठी आज (Beed) बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरवात केली आहे. (Maharashtra News)
बीडच्या (Beed News) धारुर येथील देवस्थान व इनामी जमीनी घोटाळ्यात दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करा. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत उठणार नाही; असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सय्यद बाबामिया यांनी दिला आहे.
स्वतः व नातेवाईकांच्या नावाने जमिन हडपल्या
महसूल अधिकारी, धारूर तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी यांच्या संगनमताने देवस्थान इनामी जमिनीची स्वतः व नातेवाईकांच्या नावाने करुन घेत शेकडो एकर जमीन हडपण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.