Child Marriage Saam tv
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीचा विवाह; सासरी येताना नजर चुकवत तिने गाठले पोलीस ठाणे, जळगावशी आहे कनेक्‍शन

अल्पवयीन मुलीचा विवाह; सासरी येताना नजर चुकवत तिने गाठले पोलीस ठाणे, जळगावशी आहे कनेक्‍शन

विनोद जिरे

बीड : जळगाव येथील अवघ्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह बीडच्या डोंबरी गावच्या तरुणाशी बळजबरीने लावून दिला. सासरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या सासऱ्याची नजर चुकवून तिने बसस्थानकातून थेट अंबड (Police) पोलिस ठाणे गाठले. तेथे आपली आपबीती पोलिसांना सांगितली. यानंतर आई- मामा, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. (Beed News Child Marriage)

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून खानदेशातील जळगाव (Jalgaon) येथील 15 वर्षीय मुलीच्या वडिलांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. वडिलांनी मृत्यूपूर्वी तिचा (Marriage) विवाह बीडच्या (Beed) पाटोदा तालुक्यातील डोंबरी गावच्या एका तरुणाशी ठरवला होता. वडील गेल्यानंतर मुलगी अल्पवयीन असतांना देखील तिच्या आई व मामा यांनी त्या तरुणाशी विवाह लावून दिला. लग्नानंतर तिने पती पसंत नसल्याचे सांगून मला माहेरी घेऊन जा; अशी विनंती आई आणि मामाकडे केली. त्यामुळे त्यांनी तिला जळगावला परत आणले.

नजर चुकवत गाठले पोलिस स्‍टेशन

गत महिन्यात 23 जुलैला मुलीचा सासरा तिला घेण्यासाठी जळगावला आला. यावेळी सासरी निघालेल्या मुलीने जळगाव बसस्थानकातून सासऱ्याची नजर चुकवली व दुसऱ्या बसने जालना जिल्ह्यातील अंबडला पोहोचली. यावेळी तिने अंबड पोलीस ठाणे गाठून आपली आपबिती सांगितली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून आई, मामा, पती आणि सासऱ्यावर बालविवाह प्रतिबंधक अधिनियमान्वये अंबड पोलिसात गुन्हा नोंदविला. त्यानंतर हा गुन्हा बीडच्या पाटोदा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. तर मुलीला जवळच्या कोणत्याही नातेवाईकाचा आधार नसल्याने तिला जालना येथील सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : हॉटेलच्या शेजारील झुडपात आढळला तरुणाचा मृतदेह; चिखलीतील घटनेनं पुणे हादरलं!

Gokul : शासननियुक्त चार संचालक कोण? गोकुळचा पडद्यामागचा खेळ सतेज पाटलांकडून संघर्ष मोर्चा सभेत उघड, राजकारणात खळबळ!

Maharashtra News Live Update: मुंबईत रॉकेट फटाके उडवण्यावर पूर्णतः बंदी; महापालिका आयुक्तांचा आदेश

Skin Care Tips For Women: महिलांसाठी खास स्किनकेअर रूटीन: चेहऱ्यावर कशाच्या नंतर काय लावले पाहिजे? जाणून घ्या

Satej Patil: कोल्हापुरातून सत्तांतराचं बीज पेरलं गेलंय, २०२९ मध्ये महाराष्ट्रात परिवर्तन घडवणार; सतेज पाटलांचा सरकाराला इशारा

SCROLL FOR NEXT