Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: गारपिटीने शिमला मिरची, टोमॅटोचा सडा; शेकडो कोंबड्यांचा मृत्यू

गारपिटीने शिमला मिरची, टोमॅटोचा सडा; शेकडो कोंबड्यांचा मृत्यू

विनोद जिरे

बीड : जिल्‍ह्यात गारपीट झाल्‍यामुळे बीडच्या बेलखंडी पाटोदा गावात (Beed News) आंब्याच्या झाडाला पालासुद्धा राहिला नाही. शिमला मिरची त्याबरोबरच टोमॅटोचा सडा पडला आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतल्याने (Farmer) शेतकरी खचून गेला. या पिकासाठी केलेला खर्च देखील निघेल की नाही अशी अवस्था शेतकऱ्याची झाली. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी होत आहे. (Tajya Batmya)

बीड जिल्ह्यामध्ये शनिवारी अवकाळी पाऊस आणि गारपिट यामुळे शेती पिकांसह फळबागांचा मोठे नुकसान झाले. कधी नव्हे असा गारांचा पाऊस झाल्याने शेतकरी हैराण झाला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मिरच्याचा आणि टोमॅटोचा सडा पडला आहे. हाती आलेले पीक आता वाया गेले. तसेच मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील झालेली आहेत. अनेक जनावरांचे जीव देखील यामध्ये गेला आहे.

शेकडो कोंबड्यांचा मृत्‍यू

बेलखंडी पाटोदा गावातील अनिल माने या शेतकऱ्याने शेतात मुक्त कुक्कुटपालन सुरू केले होते. मात्र गारपिटीने २०० कोंबडी आणि पिल्ले झोपल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर शेळीची तिन पिल्लेही मरण पावली. त्यामुळे शेतकऱ्याचा प्रचंड आर्थिक नुकसान झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : कोणाला जवळ करावं, कोणाची साथ सोडावी? चाणक्यांनी सांगितला नात्यांबाबतचे 8 महत्त्वाचे धडे

Kalyan Dombivli: उंबरडे डंपिंग ग्राउंडच्या सुपरवायझरला भाजप आमदाराच्या समर्थकाकडून मारहाण, धक्कादायक कारण आलं समोर

Konkan Beaches : ऑक्टोबरच्या कडक उन्हात थंडगार समुद्रकिनाऱ्याची सफर! पाहा कोकणच्या कुशीत लपलेले 'हे' ७ सुंदर किनारे

Maharashtra News Live Update: धुळे तालुक्यातील आदिवासी बांधवांचे तलावात उतरून आंदोलन

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

SCROLL FOR NEXT