St Bus Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : ६ दिवसानंतर पोलीस बंदोबस्तात बससेवा सुरू; मोजक्याच बस मार्गस्थ

Beed News : ६ दिवसानंतर पोलीस बंदोबस्तात बससेवा सुरू; मोजक्याच बस मार्गस्थ

विनोद जिरे

बीड : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर बीडमध्ये मराठा आंदोलकांकडून बसची जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर (Beed) बीडसह जिल्ह्यातील सर्व बसफेऱ्या एसटी महामंडळाने (MSRTC) बंद केल्या होत्या. मात्र सहा दिवसानंतर बससेवा सुरु करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता आंदोलनाची (Maratha Aarkshan) तीव्रता कमी झाल्याने गेल्या ६ दिवसांपासून ठप्प असणारी सर्वसामान्यांची जीवनवाहिनी लालपरी ही आज सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाली आहे. सकाळपासून ११ बसेस (ST Bus) या विविध मार्गावर मार्गस्थ देखील झाल्या आहे. मात्र या बसेस अपुऱ्या पडत असल्याने आणि बस मिळत नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तोडफोड झाल्याने मोजक्याच बस रस्त्यावर 

बीड शहरातील जाळपोळीच्या घटनेदरम्यान बस स्थानकात लावलेल्या जवळपास ६० एसटी बसेसवर जमावाने टार्गेट केल्या आणि त्या बसची मोठी तोडफोड करत नुकसान केलं. यामुळे या बसेसच्या दुरुस्तीचा प्रश्न एसटी महामंडळापुढे उभा आहे. दरम्यान आज सकाळपासून बीड बसस्थानकात आलेल्या नितीन सोनवणे या प्रवाशाला परभणीला जायचे आहे. मात्र परभणीला एकही बस सोडली नसल्याने या प्रवाशाला मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : शक्तिवर्धक औषध घेणं जिवावर बेतलं ! धावता-धावता मानसिक संतुलन बिघडलं, पोलीस भरती दरम्यान घडला भयानक प्रकार

Maharashtra Live News Update : यो यो हनी सिंगच्या पुण्यातल्या कॉन्सर्ट वर पावसाच सावट

Marathi Singer Death: प्रसिद्ध मराठमोळा गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

भाजप नेत्याच्या छळाला कंटाळून वृद्ध व्यक्तीने संपवले जीवन; नागरिकांमध्ये संतापाची लाट

Shaktipeeth Expressway New Route: शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा; ९ गावांचा समावेश; कसा असणार मार्ग?

SCROLL FOR NEXT