school open 
महाराष्ट्र

कोरोनाचे नियम पालन करत बीडमधील शाळा सुरू; विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद

कोरोनाचे नियम पालन करत बीडमधील शाळा सुरू; विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद

विनोद जिरे

बीड : बीड (Beed) जिल्ह्यात ओस पडलेल्या शाळांमध्ये आजपासून चिमुकल्यांचा किलबिलाट गुंजत आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेंसह खाजगी अशा तीन हजार ६८५ शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू झाल्‍यानंतर पहिल्‍या दिवसाप्रमाणे विद्यार्थ्यांकडून शाळेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

कोरोना व्‍हायरसचा वाढत्‍या प्रादुर्भावामुळे सर्वच शाळा बंद झाल्‍या होत्‍या. यामुळे ऑनलाईन शिक्षण या पर्यायावर विद्यार्थी व शिक्षकाचे नाते राहिले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्‍यामुळे आजपासून शाळा सुरू करायला मान्‍यता दिली. त्‍यानुसार कोरोनाचे नियम आखून राज्‍यात सर्वत्र शाळा सुरू झाल्‍या.

शिक्षण विभागाची नजर

प्रत्येक शाळेत कोरोनाची नियमावली अमलात आणली जाते की नाही? यावर शिक्षण विभागाची करडी नजर आहे. तर शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत शासनाच्या आरोग्य विभागाच्या नियमांचे पालन केले जातेय. दरम्यान बीड शहरातील महत्त्वाची समजलल्या जाणाऱ्या, सेन्टेन्स इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.

त्‍या विद्याथ्‍र्यांना गेटपासूनच परत

पहिलीपासून दहावीपर्यंत विद्यार्थी मोठ्या संख्येने, पहिल्या दिवसापासून शाळेत सहभागी होत आहेत. तर शाळा प्रशासनाकडून गेटवरच विद्यार्थ्यांचे टेम्प्रेचर चेक केले जात आहे. ज्या विद्यार्थ्याला मास्क नसेल किंवा टेम्प्रेचर वाढलेले असेल, त्या विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश दिला जात नाही. अशी माहिती शाळा व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद

Pune Tourism : पुणे फिरण्याचा प्लान करताय? मग 'हे' ठिकाण लिस्टमध्ये ठेवाच

Raghav Juyal : राघव जुयालने लोकप्रिय अभिनेत्रीच्या थोबाडीत मारली? पाहा व्हायरल VIDEO मागचे सत्य

Mandale to Chembur Metro : मुंबईकरांची प्रतिक्षा संपणार; मंडाळे ते चेंबूर मेट्रो महिन्याच्या अखेरीस सुरु होण्याची शक्यता | VIDEO

Teachers Salary: दीड लाख शिक्षकांचा पगार थांबणार; सुप्रीम कोर्टानंतर शिक्षण विभागाकडूनही कोंडी?

SCROLL FOR NEXT