Beed MNS Saam tv
महाराष्ट्र

Beed MNS: मनसे पदाधिकाऱ्यांची जिल्हा रुग्णालयात गुंडगिरी; भीतीपोटी 17 निवासी डॉक्टर अंबाजोगाईला परतले

विनोद जिरे

बीड : बीड जिल्हा रुग्णालयात मनसे पदाधिकाऱ्यांकडून गुंडगिरी करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात रुग्णालयातील डॉक्टरला शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. मोबाईलमध्ये कैद झालेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

बीड (Beed) जिल्हा रुग्णालयात अपघातात क्रतीक टाकळकर (वय ३०, रा. नाळवंडी नाका) याचा अपघात झाल्याने जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात दाखल करण्यात आले होते. डोक्याला मार असल्याने सीटीस्कॅन करून रुग्ण परत आला. त्याच्या रिपोर्टला वेळ लागत असल्याने व्हिडीओ काढला. तो पाहून डॉ. कार्तिक हे सर्जन डॉ. सदाशिव राऊत यांना फोनवरून सांगत होते. याचवेळी (MNS) मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांनी तेथे येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. उपचार केले नाहीत, न्यूरोसर्जन का नाही? अशा प्रकारचे प्रश्न करत डॉक्टरची कॉलर पकडली. तसेच सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. खुर्चीवर बसलेल्या निवासी डॉक्टरांना दोन पदाधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केली. 

भीतीपोटी १७ डॉक्टर रुग्णालयातून गेले 

मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालण्यात आला. डॉक्टर, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. रुग्णालयातील निवासी डॉक्टरला धक्काबुक्की केली. या गुंडगिरीच्या भीतीपोटी जिल्हा रुग्णालयातील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे १७ डॉक्टर तातडीने निघून गेले आहेत. यामुळे बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सेवा मोठा परिणाम होणार आहे. तर डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या व शिवीगाळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वैद्यकीय क्षेत्रामधून केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Richest Marathi Actress: मराठी चित्रपटातल्या श्रीमंत सिनेतारका; सर्वाधिक मालमत्ता कोणाची?

Ladki Bahin Yojana : सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात किती पैसे येणार? महत्वाची अपटेड समोर

Maharashtra News Live Updates: - इम्तियाज जलील यांच्या तिरंगा रॅलीमुळे मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक ठप्प

Bharatshet Gogawale: अखेर भरत गोगावले अध्यक्ष बनले एसटीचे अध्यक्ष, 2 दिवसांच्या नाराजीनंतर स्वीकारला पदभार

Rajgad Fort : इतिहासाची उजळणी करायचीय? फक्त 'या' ठिकाणाला द्या भेट

SCROLL FOR NEXT