Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : बँक शाखा व्यवस्थापकास पाईपने मारहाण; घटनेनंतर बँक अधिकारी कर्मचाऱ्यांचा तहसीलवर मोर्चा

Beed News : बीड जिल्ह्यातील धर्मापुरी येथील घडलेल्या प्रकाराबाबत धर्मापुरी येथील तुषार फड याच्यासह अन्य दोघांवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

विनोद जिरे

बीड : महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कर्ज प्रकरण टाकलेल्या ग्राहकाकडे कर्ज मंजुरीपूर्व पाहणीसाठी गेलेल्या बँकेच्या धर्मापुरी येथील शाखा व्यवस्थापकास लाथाबुक्के, पाईप अन सिमेंटच्या कुंड्यांनी जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत शाखा व्यस्थापक राहुल भालेकर हे जखमी झाले आहेत. 

बीड (Beed) जिल्ह्यातील धर्मापुरी येथील घडलेल्या प्रकाराबाबत धर्मापुरी येथील तुषार फड याच्यासह अन्य दोघांवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊन दोन दिवस उलटले; तरी देखील आरोपींना अटक केली नाही. यामुळे आता परळीत बँक अधिकारी आणि कर्मचारी आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यातील बँक (Bank) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परळीत एक होत मोर्चा काढला आहे. शहरातून हा मोर्चा काढत त्यांनी परळी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले आहे.

दरम्यान मारहाण करणाऱ्याने या अगोदरही असाच गुन्हा केला आहे. त्याविषयी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे. त्यामुळे सदरील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे. त्याचबरोबर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं, ही मागणी घेऊन हे आंदोलन करण्यात आल आहे. मात्र जर मागण्या पूर्ण नाही झाल्या, तर त्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देखील यावेळी आंदोलक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT