Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: गाढ झोपेतील परिवार थोडक्यात बचावला; मध्यरात्री घरावर पेट्रोल टाकुन जाळण्याचा प्रयत्न

Beed News : आगीचे लोळ पाहून गोविंद व वैजीनाथसह घरातील लहान मुलांनी आरडाओरड केला. यामुळे शेजारी लोक मदतीला धावले

विनोद जिरे

बीड : पत्र्याच्या शेड असलेल्या घरात कुटुंब झोपलेले होते. या झोपलेल्या कुटूंबीयांना घरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना (Beed) बीडच्या केज तालुक्यातील ढाकेफळ येथे घडली. सदर घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून सुदैवाने एकाला जाग आल्याने या घटनेतून सर्वजण बचावले आहेत. (Maharashtra News)

बीड जिल्ह्यातील ढाकेफळ गावातील गोविंद दिलीप थोरात व त्यांची पत्नी तसेच वैजनाथ व्यंकटी थोरात हे पत्नी व दोन मुलांसह हनुमान मंदिरापाशी एकमेकांच्या शेजारीच पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. (Crime News) नेहमीप्रमाणे ते घरात झोपलेले असताना काल मध्यरात्रीनंतर अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याच्या हेतुने घरावर पेट्रोल टाकून आग लावली. पेट्रोलमुळे आगीचा भडका उडाला. त्यामुळे घरातील सर्वजण जागे झाले. आगीचे लोळ पाहून गोविंद व वैजीनाथसह घरातील लहान मुलांनी आरडाओरड केला. यामुळे शेजारी लोक मदतीला धावले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लहान मुलांना काढले बाहेर, एक जण जखमी  

धनराज थोरात यांनी लहान लेकरांना व सर्वांना बाहेर काढले. यामध्ये वैजनाथ थोरात यांच्या हात, पाय, डोक्याला भाजले. तसेच गोविंद थोरात व त्यांची पत्नी यांनाही आगीची झळ लागल्याने जखमा झाल्या आहेत. दरम्यान याप्रकरणी बीडच्या युसुफवडगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! जुनी पेन्शन योजना परत येणार; 'या' राज्य सरकारच्या निर्णयाने खळबळ

Maharashtra News Live Update: पंढरपूरमध्ये मिरवणूकीच्या कार्यक्रमात मंदिरासमो हवेत गोळीबार

Jio Recharge: खुशखबर! फक्त 666 रुपयांमध्ये इतक्या दिवसांची वैधता, Jio चा जबरदस्त रिचार्ज प्लान

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

SCROLL FOR NEXT