Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : क्षीरसागरांचा ४० वर्षाचा दबदबा मिटवायचाय; आशुतोष मेटेंचे क्षीरसागरावर टीकास्त्र   

Beed News : वडिलांनी जे काम केले, ते धर्म, जाती ला सोडूनच केले आहे. त्यानुसारच आईदेखील काम करणार, असे वचन देतो.

विनोद जिरे

बीड : इस बीड मे क्या चल रहा है.. रस्ता, पाणी, लाईट, नाली कूछ नहीं..इस लिये मेरे आई को जिताके क्षीरसागर को हमे गिराना है. इस क्षीरसागर का ४० साल का दबदबा अब हम इधर से खतम करेंगे..असं म्हणत आई ज्योती मेटे यांच्यासाठी प्रचाराच्या मैदानात उतरलेल्या आशुतोष विनायकराव मेटे यांनी पहिल्याच भाषणात क्षीरसागर कुटुंबावर टीकास्त्र डागले आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बीड (Beed News) शहरातील जाहीर सभेत आशुतोष मेटे बोलत होते. यावेळी आशुतोष मेटे म्हणाले, की वडिलांनी जे काम केले, ते धर्म, जाती ला सोडूनच केले आहे. त्यानुसारच आईदेखील काम करणार, असे वचन देतो. यानंतर वचन दिले आणि ते पूर्ण केले नाही; असे कोणीही म्हणू शकणार नाही. कारण एकदा फोन केला तर पुन्हा नव्याने फोन करण्याची वेळ येणार नाही; याचेही वचन देत असल्याचे सांगत मेटे यांनी ज्योतीताईंची निशाणी लक्षात ठेवा आणि क्षीरसागरला पडून निवडून द्या; असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

बीड नगरपालिकेला ३२० कोटी रुपयांचा बजेट होता. पण काही विकास दिसत आहे का? नगरपालिका हि क्षीरसागर यांच्या ताब्यात होती. पण विकास काहीच झाला नाही. रस्ते, नाला नाही. तर कुठे घर, लाईट, पाणी देखील नाही. यामुळे क्षीरसागर घराण्याचा  ४० वर्षाचा दबदबा होता, तो आता मिरवायचा आहे. असं म्हणत आई ज्योती मेटे यांच्यासाठी मैदानात उतरलेल्या आशुतोष विनायकराव मेटे यांनी पहिल्याच सभेत क्षीरसागर कुटुंबावर टीकास्त्र डागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

Maharashtra News Live Update: पुण्यात विषारी दारूने घेतले १८ जणांचे बळी; बाहेरून 'गावठी' आणून 'मिथेनॉल' मिसळले

Mumbai CNG Price Hike : मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! CNG आणि PNG च्या दरांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या ताजे दर

Bus Accident : पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भयंकर अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

Pravin Tarde : 'देऊळ बंद २'च्या धामधूमीत प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; चाहत्यांना दिलं भन्नाट सरप्राइज, वाचा नेमकं काय म्हणालं?

SCROLL FOR NEXT