Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: अंबाजोगाई तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; आक्रोश मोर्चा काढत शेतकऱ्यांची मागणी

Beed News : अंबाजोगाई तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; आक्रोश मोर्चा काढत शेतकऱ्यांची मागणी

विनोद जिरे

बीड : यंदाच्या पावसाळ्यात बीड जिल्ह्यात अपेक्षित पाऊस पडला नाही. यात अंबाजोगाई तालुक्यात (Beed) पाऊस नसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे अंबाजोगाई (Ambajogai) तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दुष्काळी आक्रोश मोर्चा काढला. (Breaking Marathi News)

अंबाजोगाई तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न, खरीप पिकाचा प्रश्न पिकविम्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अंबाजोगाई तालुका (Rain) दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानापोटी प्रति हेक्टरी १ लाख रुपये खात्यावर तात्काळ द्यावेत. अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पावसाने दडी मारल्याने बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात खरीप पिके करपून गेले आहेत व पिण्याच्या पाण्याची देखील समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे अंबाजोगाई तालुक्यात दुष्काळ जाहीर करा. या मागणीसाठी अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: ठाकरेंनंतर नाशिकमध्ये शिंदेंनाही मोठा झटका; माजी खासदार भाजपच्या वाटेवर

Maharashtra Live News Update: अंतराळवीर शूभांशू शुक्ला पृथ्वीवर दाखल

कर्जतच्या हालीवली गावात जादूटोण्याचा थरार, दोघांना पकडले अन्...; नेमकं काय घडलं? VIDEO

Infinix Hot 60 5G+: iQOO आणि Poco यांना टक्कर देणारा नवीन बजेट स्मार्टफोन

Tejashri Pradhan: 'गालावर खळी, डोळ्यात धुंदी' तेजश्री प्रधानचे हे फोटो पाहून पागल व्हाल

SCROLL FOR NEXT