Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: धक्‍कादायक..शौचालयाच्या बकेटमध्ये स्त्री जातीचे मृत अर्भक; कुमारी मातेसह दोन महिलांना अटक

शौचालयाच्या बकेटमध्ये स्त्री जातीचे मृत अर्भक; कुमारी मातेसह दोन महिलांना अटक

विनोद जिरे

बीड : शौचालयाच्या बकेटमध्ये स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आले आहे. बीडच्या अंबाजोगाई (Ambajogai) शहरातील स्वराती रुग्णालयात प्रकार उघडकीस आला असून सीसीटीव्ही (CCTV) फुटेज वरून याचा उलगडा झाला आहे. यावरून अर्भक टाकणाऱ्या कुमारी मातेसह दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. (Breaking Marathi News)

अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या (Hospital) अपघात विभागातील शौचालयात 8 दिवसांपूर्वी सकाळी सफाई कर्मचारी यांना बकेटमध्ये पाण्यात बुडालेले स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आले होते. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अर्भकाची होणार डीएनए

पोलिसांनी तपास करताना रुग्णालयातील सर्व सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यावरून अर्भक टाकणाऱ्या कुमारी मातेसह इतर दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. यात कुमारी मातेची वैद्यकीय तपासणी होणार आहे. अर्भकाची तपासणी औरंगाबाद येथे डीएनए व वेगवेगळ्या तपासणी केल्यानंतरच उलगडा होईल. अत्याचारातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. अत्याचार झाला तेव्हा पिडीता अल्पवयीन होती. त्यामुळे या प्रकरणात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Vastu Tips: घरातील किचनविषयी 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होणार, ५ राशींची होणार चांदी; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Ayodhya Ram Temple Trust New CEO: राम मंदिराचे नवे सीईओ जितेंद्र मिश्रा कोण आहेत?

Sleep Health : वयानुसार किती तास झोप गरजेची आहे? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: वाशिमच्या दुबळवेल जगदंबा देवीच्या मंदिरात चोरी

SCROLL FOR NEXT