Accident News
Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: रस्त्याच्या कडेला उभ्‍या असलेल्या चिमुकल्याला कारने चिरडले

विनोद जिरे

बीड : पैठण- बारामती रस्त्याच्या कडेला उभ्‍या असलेल्‍या चिमुकल्याला भरधाव कारने चिरडल्याची हृदयद्रावक घटना बीडच्या (Beed) आष्टी तालुक्यातील कडा येथे घडली. (Beed Accident News)

आष्टी (Ashti) तालुक्यातील कडा येथील संतोष मोटे हे हॉटेल व्यवसायिक असल्याने रात्री हॉटेल बंद करून घराकडे पत्नी व 2 मुलांसह जात होते. काही कामानिमित्त रस्त्याच्या कडेला थांबले. यावेळी अचानक धामणगावकडून कड्याकडे येत असलेल्या भरधाव कारने रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या रुद्राला जोरदार धडक (Accident) दिली. यात रुद्र गंभीर जखमी झाला.

उपचाराला नेतानाच मृत्‍यू

दरम्यान रुद्रा संतोष मोटे या चिमुकल्याला अहमदनगर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामूळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Temperature : नांदेड जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद; पारा पोहचला ४३ अंशाच्या वर

Explainer : लोकल प्रवाशांची सहनशीलता संपलीय का? तुम्हाला काय वाटतं?

Today's Marathi News Live : मला मिळालेला प्रतिसाद १००१% निवडून येण्यासारखा; अर्चना पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

Yoga Tips: योगा करताना 'या' चुका टाळा अन्यथा होतील गंभीर परिणाम

Prasad Khandekar Birthday : 'पश्या खूप मोठा हो, यशाचे शिखरं गाठ...' नम्रता संभेरावने दिल्या प्रसाद खांडेकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT