Beed Crime News : बीड जिल्ह्यात नातीचं रक्ताळल्याचं समोर आलंय. रक्तरंजित थराराने बीड जिल्हा हादरला असून गेल्या वर्षभरात तब्बल 60 खुनाच्या घटना घडल्या आहेत. शेती संपत्तीचे वाद, अनैतिक संबंध, व्यसनाधीनतेतून वाढलेला बेफामपणा व सूडभावनेतून रक्ताची नातीच एकमेकांच्या जिवावर उठत आहेत.
बहुतांश प्रकरणांत दुभंगलेली मने वेळीच न जुळल्याने शेवट रक्तरंजित झाल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यात सरासरी महिन्याला 5 खून होत असून 10 जणांवर खुनी हल्ले होत आहेत. बांधाचे, शेतीचे वाद पिढ्यान्पिढ्या धुमसत राहात असल्याने यातून कटुता वाढत आहे. त्यामुळे कधी मारामारी होते; तर कधी मारामारीचे पर्यवसान खुनासारख्या गंभीर घटनांमध्ये होत आहे. यासोबतच संपत्ती, संशय, अनैतिक संबंध यांतूनही रक्ताच्या नात्याला संपविण्याची मानसिकता वाढत चाललेली आहे.
पतीने पत्नीचा, मुलाने जन्मदात्याचा खून केल्याच्या घटनाही आजूबाजूला घडत आहेत. जगण्यातील बेफामपणा, सूड व क्रौर्याच्या मानसिकतेला लगाम घालायचा कसा ? असा प्रश्न निर्माण झाला असून या रक्तरंजित घटना या नववर्षात तरी थांबव्यात. अशीचं अपेक्षा सर्वस्तरातून होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.