Ration Subsidy Saam tv
महाराष्ट्र

Ration Subsidy : रेशन ऐवजी अनुदानाचे पावणे पाच कोटी जमा; बीड जिल्ह्यात २४ हजारावर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रक्कम

Beed News : गहू, तांदूळ उपलब्ध होणार नसल्याने शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्न धान्य ऐवजी रोख रक्कम देण्यासाठी निर्णय जाहीर करण्यात आला आहे

विनोद जिरे

बीड : राज्य शासनाने केशरी शिधा पत्रिकाधारक अर्थात एपीएल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट पैसे (Beed) जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बीड जिल्ह्यातील २४ हजार ५६५ शिधा पत्रिकाधारकांच्या (Ration) बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. (Live Marathi News)

राज्यातील एपीएल म्हणजे केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना प्रती महिना प्रति सदस्य २ रुपये प्रति किलो गहू व ३ रुपये प्रति किलो तांदूळ या दराने ५ किलो अन्न-धान्याचा लाभ दिला जात (Bank) होता. पण यापुढे गहू, तांदूळ उपलब्ध होणार नसल्याने शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्न धान्य ऐवजी रोख रक्कम देण्यासाठी निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ज्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ठ न झालेल्या केशरी रेशन कार्ड धारकांना अन्न-धान्य ऐवजी प्रत्येक महिन्याला प्रती लाभार्थी १५० रुपये रोख रक्कम थेट खात्यात जमा केली जाणार आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बीड जिल्ह्यातील १ लाख २६ हजार ४८६ एपीएल शिधा पत्रिका धारकांपैकी २४ हजार ५६५ जणांना अनुदानाचा लाभ मिळाला आहे. त्यानुसार ४ कोटी ४६ लाख ८५ हजार ९०० रुपये संबंधिताच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. दरम्यान या अनुदानामुळे त्यांना बाजारातून धान्य खरेदी करणे शक्य झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रामदार आठवले आणि अंबादास दानवे यांची भेट...

5 Healthy Drinks For Cholesterol And Heart: बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रोज प्या ‘ही’ 5 हेल्दी ड्रिंक्स; हृदयासाठीही ठरतील फायदेशीर

Pali Fort : सह्याद्रीतील पगडीसारखा दिसणारा किल्ला, 'पाली'जवळ वसलंय अनोखं ऐतिहासिक ठिकाण

Immunity Booster : वारंवार आजारी पडताय? रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Palghar Tribal Ashram School : आदिवासी आश्रमशाळेत धक्कादायक घटना! पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

SCROLL FOR NEXT