Beed Crime News Saam TV
महाराष्ट्र

Beed News: बीडच्या घोसापुरी शिवारात १७ वर्षीय मुलीची हत्या; पोलिसांना अत्याचाराचा संशय, तपास सुरू

Beed Crime News: बीडपासून जवळच असणाऱ्या घोसापूर्वी शिवारामध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

विनोद जिरे

Beed Latest Crime News

बीडपासून जवळच असणाऱ्या घोसापूर्वी शिवारामध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्याचार करून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. होळीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अश्विनी (वय १७) असं हत्या झालेल्या मुलीचं नाव आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यातील एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. तर उर्वरीत 2 आरोपी फरार झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आश्विनीची हत्या तिच्या मामाच्या मुलासह नातेवाईकातील मुलांनीच केली आहे. (Breaking Marathi News)

दरम्यान पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला असून काही वेळात अत्याचार झालाय की नाही? स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेनं संपूर्ण बीड जिल्हा हादरला असून घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने खरेदीदारांना मोठा झटका! सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर बदलले; पाहा तुमच्या शहरातील 24 आणि 22 कॅरेटचे आजचे भाव?

Aishwarya Rai Video : Queen Is Back! ऐश्वर्या राय Cannes मध्ये चमकली; लेक आराध्याच्या लूकनं वेधलं लक्ष, सौंदर्य पाहून नेटकरी म्हणाले- "आई तशी लेक"

Accident News : बीडमध्ये मोठी दुर्घटना! विहिरीमध्ये ड्रिलिंग करताना दोन कामगारांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार फिल्डिंग

Satara : घनदाट जंगलाच्या कुशीत वसलाय किल्ला, साताऱ्याला गेल्यावर 'हे' ऐतिहासिक ठिकाण नक्की फिरा

SCROLL FOR NEXT