abdul Sattar, supriya sule, beed Saam Tv
महाराष्ट्र

NCP Protests Against Abdul Sattar Statement On Supriya Sule: 'अब्दुल सत्तारला आम्ही कोळशासारखं जाळू'

आज अब्दुल सत्तार यांच्या विधानानं राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.

विनोद जिरे

Abdul Sattar Controversy : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक झाली आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तारांचा प्रतीकात्मक पुतळा बीड येथे जाळण्यात आला. तर एका महिलेविषयी अश्लील भाषेत बोलत, बेताल वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तारचा या खोके सरकारने तात्काळ राजीनामा घ्यावा. अन्यथा या कृषिमंत्री अब्दुल सत्तारांना आम्ही कोळश्यासारखं जाळू असा सणसणीत आणि टोकाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष ऍड हेमा पिंपळे यांनी दिला आहे. (abdul sattar latest news)

बीड (beed) येथे थेट जिल्हाधिकाऱ्यांना दारू विषयी विचारणाऱ्या अब्दुल सत्तारांचे (abdul sattar) पुन्हा एका त्यांच्या दुस-या वक्तव्याने चर्चेत आले आहेत. महिला खासदार असणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या विषयी सत्तार यांनी केलेले वक्तव्य (Abdul Sattar Statement on Supriya Sule) वादग्रस्त ठरले आहे. एका महिला खासदाराविषयी बोलताना अब्दुल सत्तारांची जीभ घसरल्याने सत्तारांच्या विरोधात राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. (Maharashtra News)

दरम्यान आज बीड शहरातील राष्ट्रवादी भवन समोर अब्दुल सत्तारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला आहे. यावेळी अब्दुल सत्तार हाय हाय म्हणत सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. या खोके आणि मिन्दे सरकारने तात्काळ बेताल वक्तव्य करणा-या अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा कोळशासारखं अब्दुल सत्तारांना जाळू असा टोकाचा इशारा राष्ट्रवादी महिला प्रदेश उपाध्यक्ष हेमा पिंपळे (Hema Pimpale) यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: बायकोच्या मोबाईलवर लोकेशन आलं अन् पायाखालची जमीनच सरकली; शेवटचा मेसेज करून वरिष्ठ इंजिनिअरने आंब्याच्या झाडाला...;

Maharashtra News Live Update: जेजुरीतील अपघातातील जखमी वारकऱ्यांवर उपचार सुरू; प्रशासनाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

Daily push-ups: दररोज ३० पुशअप्स मारल्याने शरीरात कोणते बदल होतात?

महागड्या क्रीम्स कशाला? वय वाढलं तरी २१ वर्षांसारखं तरुण दिसाल; 'ही' ६ योगासनं देतील काचेसारखी स्वच्छ त्वचा

पंढरीच्या वाटेवर काळाचा घाला! ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत ट्रकने वारकऱ्यांने चिरडले, 3 महिलांचा मृत्यू; नावे आली समोर

SCROLL FOR NEXT