बीड : बीड नगरपालिकेला विविध विकास कामांसाठी आलेला निधी, स्थानिक आमदारांनी पत्र देऊन, तो इतरत्र वळवला आहे. जिल्ह्यातील बीड, धारूर, गेवराई या तीन नगरपालिकेचाचं निधी इतरत्र वर्ग केला आहे. मग परळीचा निधी का वर्ग केला नाही. असा संतप्त सवाल करत, हा निधी केवळ राजकीय द्वेषापोटी वळवण्यात आला आहे असा गंभीर आरोप बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केला आहे.
हे देखील पहा -
तर हे थांबवलेले काम तात्काळ सुरू करण्याची परवानगी द्यावी आणि बांधकाम विभागाला वर्ग केलेला निधी तात्काळ परत करावा. या मागणीसाठी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह नगरसेवकांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना निवेदन दिले आहे.
यावेळी डॉ. क्षीरसागर म्हणाले, की बीड नगर परिषदेस शासनाच्या दलित वस्ती, दलित्तेतर व वैशिष्ट्यपूर्ण योजनेचा माध्यमातून मंजूर करण्यात आलेला निधी पूर्वी न.प.बीड कडे वर्ग करण्यात आला होता.परंतु बेकायदेशीर पणे राजकीय द्वेषापोटी, हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. ही बाब जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणुन दिली असुन आपण योग्य ती कार्यवाही करुन यावर लवकर निर्णय घ्यावा. अशी विनंती केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा यावेळी डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह नगरसेवकांनी दिला.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.