Walmik Karad Threat Saamtv
महाराष्ट्र

Beed News : जेलमध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला मारहाण झाली? तुरुंग प्रशासनानं सांगितली A टू Z कहाणी

walmik karad News : जेलमध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, तुरंग प्रशासनाने मारहाण झाल्याचा दावा फेटाळला आहे.

Vishal Gangurde

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडमध्ये जिल्हा कारागृहांमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची चर्चा सुरु आहे. वाल्मिक कराडला मारहाण झाल्याच्या चर्चेनंतर राजकीय वर्तुळातही घडामोडींना वेग आलाय. मात्र, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला कोणतीही मारहाण न झाल्याची माहिती जिल्हा कारागृह प्रशासनाने दिली आहे. आरोपी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला कोणत्याही पद्धतीची मारहाण न झाल्याची माहिती कारागृह अध्यक्ष बी एन मुलानी यांनी दिली आहे.

कारागृहात नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सुदीप रावसाहेब सोनवणे आणि राजेश अशोक वाघमोडे हे त्यांच्या सर्कलसमोर सकाळी ९.१५ ते ९.३० वाजेदरम्यान त्यांच्या नातेवाईकांना दूरध्वनी करण्यासाठी आले. त्यावेळी एकमेकांकडे पाहून दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन त्यांच्यामध्ये झटपट होऊ लागली. त्यावेळी कर्तव्यावरील कारागृह कर्मचारी झटापट सोडवण्यास आले.

झटापट सुरु झाल्यानंतर इतर बंदी कारागृहाच्या सर्कलमध्ये धावत आले. या बंदींनी गोंधळ आणि शिवीगाळ करू केली. त्यावेळी कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून बंदींना पांगवलं. कर्मचाऱ्यांनी तातडीने बंदींना आपापल्या यार्डमधील बराकमध्ये बंदिस्त केलं. बंदींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी शिवाजीनगर पोलीस स्टेशन तक्रार नोंदवण्यात येत आहे. सध्या कारागृहात शांतता आहे.

दरम्यान, प्रसारमाध्यमांवर न्यायाधीन बंदी वाल्मीक कराड आणि त्याचा सहकारी बंदी सुदर्शन घुलेला कारागृहात बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती प्रसारमाध्यमांवर सुरु आहे. परंतु प्रत्यक्षात बंदी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांना कोणत्याही प्रकारची मारहाण कारागृहात झालेली नाही, अशी माहिती जिल्हा कारागृह अध्यक्ष बी एन मुलानी यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

Maharashtra News Live Update: Pune: पर्वती पायथा येथे अनेक वर्ष जुने असलेले वडाचे झाड पडले

१६७० मधील लढाईनं बदलला पुण्यातील 'या' डोंगरी किल्ल्याचा इतिहास

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

SCROLL FOR NEXT