Manjra Dam Saam tv
महाराष्ट्र

Manjra Dam : तीन जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण ओव्हरफ्लो; पाण्याची चिंता मिटली

Beed News : बीड जिल्ह्यासह लातूर व धाराशिव या तीन जिल्ह्याला मांजरा धरणातून पाणी पुरवठा होत असतो. दोन दिवसांच्या जोरदार पावसामुळे बीडच्या धनेगाव येथील मांजरा धरण १०० टक्के भरले

विनोद जिरे

बीड : राज्यात पार्टीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. पुढील काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून बीड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील मांजरा धरण शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे तीन जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली आहे. 

बीड (Beed) जिल्ह्यासह लातूर व धाराशिव या तीन जिल्ह्याला मांजरा धरणातून पाणी पुरवठा होत असतो. दोन दिवसांच्या जोरदार पावसामुळे बीडच्या धनेगाव येथील मांजरा धरण १०० टक्के भरले असून ओव्हर फ्लो झाले आहे. यामुळे तिन्ही जिल्ह्यातील ७२ गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे. बीड जिल्हात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. यामुळे (Manjra Dam) मांजरा धरणात पाण्याची आवक वाढली आहे. अजून पुढील काही दिवस पावसाची शक्यता असल्याने धरणात आणखी पाण्याची आवक होणार आहे. 

पाण्याची आवक लक्षात घेता धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडले आहेत. यामधून १७३२ क्युसेक्सने मांजरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे मांजरा नदीला देखील पूर आला असून नदी काठच्या गावांसह नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान अंबाजोगाई, केज, धारूरसह लातूर शहर व एमआयडीसी, कळंब या शहरासह ७२ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

Maharashtra Live News Update: आगामी निवडणुकी साठी महायुतीची बैठक.

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; जवळचा नेता भाजपने गळाला लावला

SCROLL FOR NEXT