Beed Gram Panchayat Election Result 2022 Saam tv
महाराष्ट्र

Beed Gram Panchayat Election Result 2022: क्षीरसागर काका पुतण्याच्या लढतीत पुतण्याचा विजय

संदीप क्षीरसागर यांची नवगन राजुरी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता...

विनोद जिरे

Beed Gram Panchayat Election : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संदिप क्षीरसागर आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर या काका पुतण्यातील सत्ता संघर्ष ग्रामपंचायत निवडणुकीत देखील पहावयास मिळालाय. नवगन राजुरी जिल्हा परिषद सर्कल मधील नवगण राजुरी या होमपीचवर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचा धुव्वा उडवत संदिप क्षीरसागर (sandeep kshirsagar) यांनी काकाला धोबीपछाड दिलाय. या सर्कलमधील चार ग्रामपंचायत संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या आहेत.

गेल्या पाच सात वर्षांपासून संदिप क्षीरसागर आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यातील सत्ता संघर्ष सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आणि अभुवला आहे. पाच वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार क्षीरसागरांनी नवगण राजुरीच्या ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला होता. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा यावेळी त्यांनी केली.

जयदत्त क्षीरसागर यांचे होमग्राउंड असणाऱ्या राजुरीमध्ये आमदार क्षीरसागर यांच्या पॅनलचा मोठा विजय झालाय. त्याचसोबत उमरद जहागीर, लिंबारुई, दगडी शहजाणपूर या ग्रामपंचायत देखील आमदार क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT