तहसीलदारावर महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा; वाळू माफियांवरील कारवाईचा परिणाम! SaamTvNews
महाराष्ट्र

तहसीलदारावर महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा; वाळू माफियांवरील कारवाईचा परिणाम!

तहसीलदार खाडेंवर गुन्हा दाखल झाल्याने, या प्रकरणात वाळूमाफीयांसह राजकीय हस्तक्षेप असल्याची चर्चा गेवराईतील सर्वसामान्य नागरिकांत रंगू लागलीय.

विनोद जिरे

बीड : गेवराईत वाळूचा वाद विकोपाला जात असल्याचं, चित्र पाहायला मिळालं आहे. गेवराईतील दोन वाळू माफियांविरोधात (Sand Mafia) घरी येऊन धमकावल्या प्रकरणी तहसीलदार सचिन खाडे यांच्या फिर्यादीवरून, गुरुवारी गेवराई पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी काल रात्री उशिरा, कोणाचीही परवानगी न घेता घरात घुसून महिलेला धमकावल्याच्या आरोपावरून, गेवराईचे (Georai) तहसीलदार सचिन खाडे यांच्यासह सहा ते सात अनोळखी व्यक्तींवर, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पाहा :

सचिन खाडे यांना गुरुवारी वाळू माफियांनी धमकावले होते. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी महिलेने खाडे यांच्याविरुद्ध तक्रार केलीय. कुसूम शिवाजी मोटे, वय 65, रा. गेवराई असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, तहसीलदार (Georai Tehsildar) सचिन खाडे हे सहा ते सात जणांना सोबत घेऊन आले. गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या घरातील कोणत्याही माणसाची परवानगी न घेता, घरात प्रवेश करून महिलेस तू तुझा मुलगा घरात लपवून ठेवला असे म्हणून धमकावले. या दिलेल्या तक्रारीवरून तहसीलदार सचिन खाडे यांच्यासह सहा ते सात जणांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी सचिन खाडे यांना वाळूमाफियांनी धमकी दिल्याने, या वाळू (Sand) माफियांवर गुन्हा दाखल झालेला आहे. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे काल रात्री उशिरा, महिलेने तहसीलदार खाडेंविरोधात तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. तर काही दिवसापूर्वीच चार मुलांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार असणाऱ्या वाळू माफियांवर गुन्हा (Case) दाखल झाला होता. त्यानंतर सचिन खाडे यांनी वाळू माफियांवर यानंतर आता, MPDA ऍक्ट, मोक्का कारवाई करू असा इशारा देखील दिला होता. तर, त्यानंतर आता खाडेंवर गुन्हा दाखल झाल्याने, या प्रकरणात वाळूमाफीयांसह राजकीय हस्तक्षेप असल्याची चर्चा गेवराईतील सर्वसामान्य नागरिकांत रंगू लागलीय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Atal Pension Yojana: या सरकारी योजनेत दर महिन्याला मिळते ₹५०००; गुंतवणूकीचं संपूर्ण कॅल्क्युलेशन वाचा

Vaidehi Parshurami Photos: लाल साडीत खुललंं वैदेही परशुरामीचं सौंदर्य, फोटो पाहा

Vande Bharat Train : मोठी बातमी! देशात आणखी ४ वंदे भारत ट्रेन सेवेत, जाणून घ्या तुमच्या शहरातून धावणार का?

SCROLL FOR NEXT