Beed Water News Saam Digital
महाराष्ट्र

Beed News: बीड जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईच्या झळा; जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

Beed Water News: दुष्काळी बीड जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. पावसाळ्यात जेमतेम पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील नदी, ओढे, पाझर तलाव कोरडे ठाक पडले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Beed District Water Shortage News

बीड जिल्हा अवर्षणप्रवण भागात मोडतो. दर दोन ते चार वर्षांनी जिल्ह्याला दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागते. पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. यामुळे सद्य स्थितीला बीड जिल्ह्यातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट दिसत आहे. त्यामुळे बीड प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आलंय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, दुष्काळी बीड जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. पावसाळ्यात जेमतेम पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील नदी, ओढे, पाझर तलाव कोरडे ठाक पडले आहेत. तर धरणांनी देखील तळ गाठलाय. त्याचबरोबर आता शेतकऱ्यांचे विहिरी बोअरचे देखील पाणी कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलं आहे.

प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील चार तालुक्यातील 18 विहिरी- बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहेत. यामध्ये बीड तालुक्यातील ६, गेवराई तालुक्यातील ४, वडवणी तालुक्यातील ५ आणि धारूर तालुक्यातील ३ अशा एकूण १८ गावांमध्ये पाण्याचे स्रोत म्हणून विहिरी आणि बोअरचे अधिग्रहण झाले आहे.

तर बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या देवपिंपरी गावांमध्ये, पाण्याच्या झळा गडद होत असल्याने त्या ठिकाणी एक पाण्याचे टँकर देखील सुरू करण्यात आले आहे.दरम्यान एकूणच बीड जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा वाढत असून यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा. असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT