Beed District Imposes Section 144 Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय; नेमकं कारण काय?

Beed District Imposes Section 144 : बीडमध्ये १५ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. दोन किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे.

Priya More

योगेश काशीद, बीड

बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने हे जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. दोन किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या प्रश्नावर नागरिक एकत्र येत आहेत. त्याचबरोबर १५ फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील हे सामूहिक साखळी उपोषणासाठी बसणार होते. त्या अनुषंगाने आणि बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यात अनेक सामाजिक संघटना न्याय मागण्यासाठी एकत्र येत आहेत.

यासोबतच जिल्ह्यात सध्या दहावी आणि बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत. तर दहावीची परिक्षा २१ फेब्रुवारीपासून चालू होणार आहे. त्या अनुषंगाने हे जमाबंदी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश लागू करण्यात आला आहे. १५ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत हा आदेश लागू असणार आहे. २ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही, असं आदेशात नमूद करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक बीड यांच्या अहवालावरून बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) प्रमाणे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही लाठी, काठी, बंदूक, तलवार, कोणतेही ज्वलनशील पदार्थ जवळ बाळगणार नाहीत असे झाल्यास आपल्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड, आधी अत्याचार मग महिलांचा गर्भपात करायचा

Weight Loss Drink Recipe : रिकाम्या पोटी प्या एक ग्लास 'हे' ड्रिंक, १५ दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल फिट

Maharashtra Live News Update : पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पुण्यासाठी आज आणि उद्या येल्लो अलर्ट

Latur Police: लाच घेताना पोलिस निरीक्षकाला अटक, ACB ची मोठी कारवाई; पोलिस दलात खळबळ

Crime: वर्षभरापूर्वी लग्न, नवऱ्याचे अनैतिक संबंध; मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या बायकोची आत्महत्या, संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT