(विनोद जिरे , बीड)
मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनही सतर्क झाले असून आज १३ रोजी मध्यरात्रीपासून २७ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तर यादरम्यान ५ पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी शिवाय एकत्र येण्यासही मनाई करण्यात आलीय. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी हे आदेश पारित केले आहेत.(Latest News)
दरम्यान या आदेशात शस्त्र, सोटे, काठी, तलवार, बंदूक, लाठ्या, काठ्या, कोणतेही दाहक पदार्थ, किंवा स्फोटके, दगड, किंवा इतर हत्यारं, तसेच शरीरास इजा करू शकणाऱ्या वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आलीय. प्रशोभक भाषणे,अंगविक्षेप, विडांबनात्मक नकल, सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षिता धोक्यात येईल. तसेच अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणतीही वस्तू बाळगण्यासही मनाई करण्यात आलीय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्याचबरोबर जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचणार असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचणारी असेल, व्यक्तीच्या / शवांच्या / प्रेते / आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन यासाठी मनाई आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही, मिरवणूका मोर्चे काढता येणार नाही. असे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.