Beed Cyber Crime News Saam TV
महाराष्ट्र

Beed Cyber Crime: सावधान! पॅनकार्डच्या नावाखाली दोघांची ऑनलाइन फसवणूक; 75 हजारांना घातला गंडा

Cyber Crime News: Online Fraud होण्याच्या घटना सुरूच आहेत. त्यामुळं आता स्वतःहून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे....

विनोद जिरे

Beed Online Fraud: सध्या जगात वेगाने ऑनलाइन व्यवहार सुरू झाल्याने ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Scammed) घटनाही झपाट्याने वाढू लागल्या आहेत. असाच प्रकार बीडजिल्ह्यामध्ये घडल्याचे समोर आले आहे. क्रेडिट कार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली नोकरदार व्यक्तीला, तर पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याला सायबर भामट्यांनी गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Beed News)

याबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव येथील भारत हिराभाऊ काळे हे नोकरी करतात. त्यांना तुमच्या क्रेडिट कार्डवर दररोज 500 रुपये देण्याची योजना सुरू झाली आहे. ती बंद करण्यासाठी कॉल करून ओटीपी मागितला. काळे यांनी ओटीपी देताच त्यांच्या खात्यावरील तब्बल 49 हजार 131 रुपये कमी झाले.

असाच प्रकार केजमधील व्यापाऱ्यासोबतही घडला आहे. नीलेश जनार्धन वाघमारे रा. लाव्हरी, ता. केज या व्यापाऱ्याला पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी कॉल आला होता. त्यांनी लिंक ओपन करून ओटीपी सांगताच त्यांच्या खात्यातूनही 24 हजार 99 रुपये कमी झाले आहेत. या प्रकरणी बीड सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे, की ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा. कोणतीही लिंक क्लिक करू नका, कोणालाही आपला ओटीपी सांगू नका, मात्र तरीही नागरिकांकडून याची काळजी घेतली जात नसल्याने, ऑनलाइन फसवणूक होण्याच्या घटना सुरूच आहेत. त्यामुळं आता स्वतःहून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

Anant Chaturdashi 2025: विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पा 'या' राशींना करणार मालामाल; अनंत चतुर्दशीला 4 शुभ महासंयोग देणार पैसा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT