Beed Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Beed Police: बीडमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. तरुणाची धारदार चाकूने वार करत हत्या करण्यात आली. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली.

Priya More
  • बीडमध्ये तरुणाची चाकूने हल्ला करत हत्या

  • हॉटेल गावकरीबाहेर घडली घटना

  • पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याची शक्यता

  • नातेवाईकांची कठोर कारवाईची केली मागणी

योगेश काशीद, बीड

बीडमध्ये तरुणाची चाकूने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली. बीडच्या केज तालुक्यातील कदमवाडी फाटा येथे ही घटना घडली. हॉटेल गावकरीबाहेर या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी केज पोलिस ठाण्याबाहेर मोठी गर्दी करत आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली. हा तरूण कदमवाडी फाटा परिसरातील हॉटेल गावकरी येथे शनिवारी रात्री गेला होता. त्या हॉटेलबाहेरच त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विलासचा मृत्यू झाला. या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावे या मागणीसाठी नातेवाईकांसह गावकरी मोठ्या संख्येने केज पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. केज पोलिसांनी फोनवरून बोलताना गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली.

तर दुसरीकडे, मावळच्या देहूरोड परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भर दिवसा झालेल्या मुलांच्या भांडणात कोयत्याने हल्ला करत एका तरुणाच्या हाताची बोटं छाटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. किरकोळ कारणावरून कोयत्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

सलग घडणाऱ्या या गंभीर प्रकारांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून देहूरोड पोलिसांकडून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवले जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. वाढत्या हिंसक घटनांमुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT