Police investigate suicide case in Beed after youth leaves note alleging harassment. 
महाराष्ट्र

Beed Crime : मला खूप मारले, बदनाम केलं..; प्रेम प्रकरणातून तरुणाची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

Beed Crime : बीडमध्ये एका तरुणाने प्रेमप्रकरणावरून आत्महत्या केली आहे. त्याने एक चिठ्ठी लिहिली असून त्यात गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Bharat Jadhav

  • प्रेम प्रकरणातून युवकाची आत्महत्या

  • सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

  • चार आरोपींवर गुन्हा दाखल

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

गुन्हेगारी राज्यभरात कुप्रख्यात झालेला बीड जिल्हा आता पु्न्हा एका आत्महत्येच्या घटनेमुळे चर्चेत आला आहे. जिल्ह्यातील मांजरसुंबा तालुक्यात एका तरुणाने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धुळे-सोलापूर महामार्गालगतच्या एका टायर पंक्चरच्या दुकानात गळफास घेत आत्महत्या केली.याप्रकरणी चार आरोपींच्या विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, या तरुणाचं शेजारच्या गावातील तरुणी प्रेमाची नाळ जुळली. दिवसामागून दिवस गेले तसं त्याचे प्रेम बहरू लागले. त्यांच्या प्रेम संबंधाची कुणकुण मुलीच्या घरच्यांना लागली. त्यानंतर त्यांनी मुलीच्या प्रियकराला आपल्या गावात बोलवून घेतले. मुलीच्या घरच्यांनी बोलावल्यानंतर तरुण कोणता विचार न करता प्रियसीच्या गावात गेला. त्यावेळी मुलीच्या घरच्यांनी त्याच्याकडील बाईक आणि मोबाईल काढून घेतला. त्यानंतर चार जणांनी त्याला बेदम मारहाण केली.

त्यानंतर तरुणाने सुसाईड नोट लिहीत धुळे-सोलापूर महामार्गालगतच्या एका टायर पंक्चरच्या दुकानात गळफास लावून आत्महत्या केली. तरुणाने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये मुलीच्या घरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मला खूप मारले, गावात चोरटा म्हणून बदनाम केले, तुला जिवे मारून टाकू अशा धमक्या दिल्या असल्याचं त्याने आपल्या नोटमध्ये म्हटलं. याप्रकरणी चार आरोपींच्या विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे तरुणाच्या आईनं एका धक्कादायक खुलासा केला आहे. मुलीच्या घरच्यांनी माझ्या मुलाला बोलावून घेतलं. त्याला झाडाला बांधून मारहाण केली. मारहाणीची व्हिडिओ काढला. मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मृत तरुणाच्या आईने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संभाजीनगरमध्ये FDA ची भेसळयुक्त पनीर आणि गाईच्या तुपावर धडक कारवाई

Fruits at night: रात्रीच्या वेळेस कोणती फळं खाऊ नयेत?

Protein-rich vegetables: या भाज्यांमधून तुम्हाला मिळेल भरपूर प्रोटीन

Pista Benefits: महिलांनी रोज न विसरता खा ५ पिस्ते; मिळतील ७ जबरदस्त आरोग्यदायी फायदे

Chocolate Cake : घरीच बनवा बेकरीसारखा चॉकलेट केक; जाणून घ्या सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT