Beed Ambajogai Women Rape Case News Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : तरुणाने लैंगिक अत्याचार केले, धर्मांतरासाठी दबाव टाकला; बीडमधील महिलेसोबत भयंकर घडलं

Beed Crime News : बीडच्या अंबाजोगाईत लग्नाचे स्वप्न दाखवून दोन वर्षे अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • अंबाजोगाईत दोन वर्षांपासून महिलेवर अत्याचार

  • लग्नाचे स्वप्न व धर्मांतरासाठी दबाव

  • पीडित महिलेची पोलिसांत तक्रार

  • आरोपी फरार

  • पोलिसांकडून शोध सुरू

योगेश काशीद, बीड

Beed Ambajogai Women Rape Case News नाशिकच्या नामांकित TCS कॉरपोरेट कंपनीतील लैंगिक छळ आणि धर्मांतराची घटना ताजी असताना आता बीड मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाचे स्वप्न दाखवून एका २८ वर्षीय महिलेवर दोन वर्षांपासून शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून सलमान अजीज पठाण याच्याविरुद्ध फसवणूक, अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने पीडितेला लग्नासाठी धर्मांतराची सक्ती केल्याचे तक्रारीत नमूद असून सध्या तो फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळची लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील रहिवासी असलेली पीडित महिला सध्या अंबाजोगाई येथे वास्तव्यास आहे. आरोपी सलमान पठाण याने तिला लग्नाचे स्वप्न दाखवून दोन वर्षांपूर्वी आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, जेव्हा पीडितेने विवाहाचा विषय काढला, तेव्हा आरोपीने तिची फसवणूक करण्यास सुरुवात केली.

त्याने पीडितेसमोर मुस्लिम धर्म स्वीकारल्याशिवाय लग्न करणार नाही अशी अट घातली. इतकेच नव्हे तर 'तुला जे करायचे आहे ते कर' असे म्हणत त्याने तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९, ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

एका महिलेच्या असहायतेचा फायदा घेऊन तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याच्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलिस निरिक्षक जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. शहर पोलीस फरार आरोपी सलमान पठाण याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास जलद होणार; मेट्रो ८ च्या कामाला वेग, गोल्डन मार्गावर किती स्टेशन असणार?

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

Health warning signs: किडनी आणि लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसतात हे बदल; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

Pune Summer Tourism: सहलीला जायाचा...! उकाड्यापासून सुटका हवीये? पुण्याजवळच्या 8 थंडगार ठिकाणी, लगेच प्लान करा

Maharashtra Politics: महिला आरक्षण विधेयकाआडून देश तोडण्याचा डाव, उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT