Beed Crime Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime : झाड तोडण्यास विरोध; व्यक्ती संतापला, आधी महिलेला शिवीगाळ, नंतर कानशिलात लगावली अन्...; बीडमध्ये खळबळ

Beed Crime News : झाड तोडण्यास विरोध केला म्हणून महिलेला चापट मारण्यात आली. तिला शिवीगाळ करण्यात आला. त्यानंतर महिलेचा पती, सासू-सासरा आणि इतर कुटुंबीयांना देखील मारहाण करण्यात आली.

Yash Shirke

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

बीडमधून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बीडच्या वडवणी तालुक्यात एक महिला आणि तिच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. शेताच्या बांधावरील झाड तोडण्यास विरोध केल्याने महिलेसह तिच्या कुटुंबावर हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी १६ ते १७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवळा ते कोरडे वस्ती दरम्यानच्या पायवाटेवर गट क्रमांक २०२, २०३, २०५ आणि २५१ या शेताच्या बांधावर तब्बल ८० ते ९० वर्षे जुनी लिंबाची झाडे आहेत. ही झाडे तोडली जात होती. तेव्हा पीडित महिलेने झाड तोडणाऱ्यांना जाब विचारला. तेव्हा महिलेला चापट मारुन, शिवीगाळ करत धमकी देण्यात आली.

त्यानंतर महिलेचे पती, सासू-सासरे आणि इतर कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. या सर्वांना हातातील काट्यांनी जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी बालकृष्ण शिंदे यांच्यासह १६ जणांच्या विरोधामध्ये वडवणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

शेतकऱ्यांच्या हक्कावर चाललेली बळजबरी आणि महिलांवरील हिंसाचाराचा हा प्रकार संतापजनक असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. आता बीडमधील या मारहाण प्रकरणात आरोपींवर कोणकोणत्या प्रकारची काराई होणार आहे, पोलिसांची पुढील भूमिका काय असेल याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT