Beed Crime News, Beed Latest Marathi News
Beed Crime News, Beed Latest Marathi News Saam TV
महाराष्ट्र

Beed Crime : बीड अवैध गर्भपात प्रकरण; त्या शिकाऊ डॉक्टरला 4 दिवसांची पोलीस कोठडी

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यातील बक्करवाडी येथील शितल गाडे या महिलेचा अवैध गर्भपात करताना, अतिरक्तस्त्राव झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. या मयत महिलेचे गर्भलिंग निदान ज्या, शिकाऊ डॉक्टरने केले होते, त्या सतीश सोनवणेला पोलिसांनी औरंगाबादमधून ताब्यात घेतलं आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Beed Crime News in Marathi)

धक्कादायक बाब म्हणजे सोनवणे याने आतापर्यंत जवळपास 150 महिलांचे गर्भलिंगनिदान केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या 150 पैकी किती मुली होत्या ? आणि त्यापैकी किती महिलांचे गर्भपात केले गेले ? याचा तपास करणे आता पोलिसांसमोर आव्हान ठरणार आहे. (Beed Latest Marathi News)

दरम्यान आतापर्यंत या प्रकरणात 7 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी 6 जण पोलिसांच्या ताब्यात असून एक महिला नर्स मयत आहे. तर पकडण्यात आलेल्या आरोपींकडून नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत असल्याने खळबळ उडाली असून यामध्ये मोठं रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

SCROLL FOR NEXT