'त्या' डांबून ठेवलेल्या ऊसतोड मजूराच्या मृत्यू प्रकरणी मुकादमावर खुनाचा गुन्हा दाखल...  विनोद जिरे
महाराष्ट्र

'त्या' डांबून ठेवलेल्या ऊसतोड मजूराच्या मृत्यू प्रकरणी मुकादमावर खुनाचा गुन्हा दाखल...

या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड - केज शहरातील शिक्षक कॉलनीत असणाऱ्या एका घरात,मागच्या दोन दिवसांपूर्वी बीड तालुक्यातील सफेपुर येथील, ऊसतोड मजुराचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली होती.अखेर याप्रकरणी मयत ऊसतोड कामगाराच्या पत्नीच्या फिर्यादीवरून, दोन दिवसांनंतर शिक्षक असणाऱ्या मुकदमासह त्याच्या भावावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

हे देखील पहा -

बाळासाहेब सोपान घोडके वय ४० असं त्या मयत ऊसतोड कामगारांचं नाव आहे. बाळासाहेब घोडके यांना मुकादम जिवराज केशव हांगे याने, २८ तारखेला सफेपुर गावातुन गाडीत बसवून, केजमध्ये डांबुन ठेवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. यादरम्यान त्यांना मारहाण झाल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. असाही मयताच्या पत्नीने आरोप केला होता.

अखेर याप्रकरणी मयताची पत्नी मीरा घोडके हिच्या फिर्यादीवरून, केज पोलीस ठाण्यात जिवराज केशव हंगे व शिक्षक असणाऱ्या बाबुराव केशव हंगे यांच्या विरुद्ध कलम 302, 365, 342 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीमध्ये धर्मांतराचा प्रयत्न, गलेलठ्ठ पैशांचं आमिष, अमेरिकन नागरिकाला अटक

Kokan Ganeshotsav : गणेशभक्तांचा प्रवास यंदाही खड्ड्यातून, मुंबई-गोवा महामार्गाची चाळण; कोकणवासीयांसमोर विघ्न कायम

IND VS ENG: पाचव्या टेस्ट सामन्यातून ऋषभ पंत बाहेर; 'या' नवख्या खेळाडूला टीम इंडियात संधी, BCCI ने केलं कन्फर्म

शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्तांनी उचललं टोकाचं पाऊल; घरातच गळफास घेत आयुष्य संपवलं

Rave Party : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खडसेंच्या जावायाचा अल्कहोल रिपोर्ट समोर

SCROLL FOR NEXT