Sudarshan Ghule And Mahadev Gite  Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: 'तुम्ही आतमध्ये असल्यामुळे वाचलात, नाही तर संतोष देशमुखपेक्षा वाईट हाल केलं असतं'; सुदर्शन घुलेची महादेव गितेला धमकी

Sudarshan Ghule: संतोष देशमुख हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघे आणि बापू आंधळे प्रकरणातील आरोपी महादेव गिते यांच्यामध्ये जेलमध्ये मारामारी झाली. आता याप्रकरणात महादेव गितेच्या पत्नीने सुदर्शन घुलेवर गंभीर आरोप केला आहे.

Priya More

योगेश काशिद, बीड

'तुम्ही आणि आम्ही आतमध्ये असल्यामुळे वाचलात. बाहेर भेटला असता तर संतोष देशमुखपेक्षा वाईट हाल केले असते अशी धमकी सुदर्शन घुलेने महादेव गितेला जेलमधील मारहाणीदरम्यान दिली होती.', अशी माहिती महादेव गितेच्या पत्नी मिरा गिते यांनी दिली.

सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गितेची पत्नी मिरा गिते यांनी पोलिस अधिक्षक नवनित कावत यांची बीडमध्ये भेट घेतली होती. यावेळी त्यांनी जेलमधील घटनेविषयीची माहिती पोलिस अधिक्षकांना दिली. परंतु पोलिस अधिक्षकांनी जेल प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांना केल्या.

दरम्यान जेलमधील मारहाण ही वाल्मीक कराडच्या सांगण्यावरुनच झाली. ३ दिवसांपासून त्यांची प्लॅनिंग सुरू होती. अगदी या मारहाणीत लाठ्या काठ्या देखील वापरल्या असल्याचा आरोप मिरा गिते यांनी केला आहे. प्रारंभी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले याला मारहाण झाल्याची चर्चा होती. पण नेमकं जेलमध्ये काय घडलं होते हे सगळं सीसीटीव्ही फुटेज समोर आणल्यास सगळे काही समोर येईल असे म्हटले आहे.

जेलमध्ये संतोष देशमुख यांचे मारेकरी आणि विलास गिते, रघु फड आणि सुदिप सोनवणे यांनी माझ्या पतीवर हल्ला केला असून या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी मी पाठपुरावा करणार असल्याचे देखील मिरा गिते यांनी सांगितले आहे. तर, 'राजेश नेहरकरने देखील त्यांच्या पत्नीला ही मारहाण झाल्यानंतर फोन केला होता की आम्हाला मारहाण झाली आणि आम्हालाच या ठिकाणाहून हलवत आहेत.' असे जयश्री नेहरकर यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT