Beed Crime Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime : धक्कादायक! ऊस तोडणीच्या पैशासाठी मजूर महिलेवर मुकादमाकडून अत्याचार; महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न

Beed News : ऊस तोड कामगार कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात जात असतात. ऊस तोडणीचे कंत्राट पद्धतीने काम घेऊन घेऊन मजुरांना त्याठिकाणी कामाला पाठविण्यात असते

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: ऊस तोडणी करून पोट भरण्यासाठी ऊसतोड कामगार वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. अनेकदा काम करून देण्यासाठी काही रक्कमेची उचल करत कामावर त्याची फेड करत असतात. मात्र उचल घेतलेली रक्कम परत न देत नाही; या कारणावरून एका महिलेवर मुकादमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

बीडच्या दिंद्रुडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऊस तोड कामगार कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात जात असतात. ऊस तोडणीचे कंत्राट पद्धतीने काम घेऊन घेऊन मजुरांना त्याठिकाणी कामाला पाठविण्यात असते. तर काम करणारे मजूर गरजेनुसार आगाऊ पैसे घेत कामावर त्याची परतफेड करत असतात. अशाच प्रकारे दिंद्रुडमध्ये तोडणीच्या कामाकरिता एका महिलेने काही रक्कम उचल म्हणून घेतली होती. 

फोटो व्हायरल केल्याने महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न 

दरम्यान मजूर महिलेने घेतलेल्या उचल रकमेतील काही रक्कम बाकी होती. हि बाकी रक्कम देत नाही म्हणून एका विवाहित मजूर महिलेवर मुकादमाकडून अत्याचार करण्यात आला. इतकेच नाही तर या महिलेचे अश्लील फोटो त्याने गावातील काही ग्रुपवर व्हायरल केले. हा प्रकार सहन न झाल्याने सदर महिलेने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलेला लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने तिचा जीव वाचला आहे. 

मुकादम फरार 

तर याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार करणारा मुकादम असलेला अमोल शिनगारे हा मात्र घटनेनंतर फरार झाला आहे. या धक्कादायक प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून संशयित आरोपीच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Accident: हिट अँण्ड रनचा थरार; मद्यधुंद कार चालकाने १४ ते १५ जणांना उडवलं

अजित पवारांच्या निधनानंतर CM देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय|VIDEO

Maharashtra Politics : तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीकडून निसटल्या? मुख्यमंत्री फडणवीस मांडणार अर्थसंकल्प

गुजरातला जास्त, महाराष्ट्राला कमी... महाराष्ट्राचे खासदार दिल्लीत भांडले पाहिजेत, अर्थ संकल्पावर बच्चू कडूंचा घणाघात

Monday Horoscope : अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, अन्यथा...; ५ राशींच्या लोकांना प्रगतीचा मार्ग गवसणार

SCROLL FOR NEXT