Beed Crime News SaamTV
महाराष्ट्र

Beed Crime : संध्याकाळी दुकान लावून घरी निघाले, सकाळी भाऊ शॉपवर पोहोचला तर पायाखालची जमीन सरकली

Beed Crime News : ज्ञानेश्वर जाधव यांनी वडवणी पोलिसांना फोन करून कळवले की, दुकानाची चोरी झाली आहे. त्यानंतर दुकानातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता चोरट्यांनी वाहनात येऊन चोरी केल्याची दिसले.

Prashant Patil

बीड : बीड जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातल्याचे दिसत आहे. चार दिवसापूर्वीच लिंबा गणेश येथे मेडिकल दुकान फोडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा चोरीची घटना घडली आहे. वडवणी पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर असलेले शहरातील मध्यवर्ती भागात निवृत्ती सर्जेराव जाधव यांचे न्यु हनुमान टोबॅको सेंटर दुकान मध्यरात्री चोरट्यांनी फोडले आहे आणि लाखोचा माल लंपास केला.

संध्याकाळी सहा वाजता दुकान बंद करून जाधव हे बाहेगव्हाण येथे घरी गेले असता दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता भाऊ ज्ञानेश्वर सर्जेराव जाधव हा दुकान उघडण्यासाठी वडवणी येथे दुकानावर आल. तेव्हा त्याला दुकान उघडलेले दिसले. आत जाऊन पाहिले असता पाठीमागील पत्र्याचे शटर तुटलेले तसेच उचकटलेले दिसले. आतून नटबोल्ट लावलेला कोंडा तुटलेला दिसला. दुकानात ठेवलेले तंबाखूचे पुडे, रोख रक्कम, सिगारेटचे पुडे, इनव्हर्टरची बॅटरी दिसली नाही. दुकानातील सामाण अस्ताव्यस्त पडलेले दिसले.

ज्ञानेश्वर जाधव यांनी वडवणी पोलिसांना फोन करून कळवले की, दुकानाची चोरी झाली आहे. त्यानंतर दुकानातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता चोरट्यांनी वाहनात येऊन चोरी केल्याची दिसले. तीन चोरटे असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले. दुकानात पाहणी केली असता दुकानातील रोख रक्कम, सिगारेट, तंबाखू, गायछाप, इनव्हर्टरची बॅटरी असं सर्व मिळून २ लाख ८२८ रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचं समोर आलं.

या चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध वडवणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. वडवली पोलीस ठाण्याच्या काही अंतरावरच दुकानात चोरी झाल्याने पोलिसांचा धाक उरला आहे की नाही? असा प्रश्न पडला आता नागरिकांना पडला आहे. वडवणी शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, रात्रीची ग्रस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT