Crime News Saam TV
महाराष्ट्र

Beed Crime News: शाळेतील शिपायाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या; बीडमधील काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Crime News: शिपायाच्या डोक्यात दगड घालून ही हत्या झालीये.

साम टिव्ही ब्युरो

Beed News: बीडमध्ये गुऱ्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. अशात बीडच्या एका शाळेतील शिपायाची निर्घृण हत्या करण्यात आलीये. शिपायाच्या डोक्यात दगड घालून ही हत्या झालीये. सदर घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शिपायाची अशी निर्घृण हत्या नेमकी कोणी केली याची माहित अद्याप मिळू शकलेली नाही. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. बीडच्या (Beed) माजलगाव शहरातील शिक्षक कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनिल सर्जेराव शेंडगे (वय 27) असं मयत तरुणाचं नाव आहे.

शिपाई तरुण आपल्या घरी असताना एका अज्ञात व्यक्तीचा त्याला फोन आला. फोनवरुन त्याला बायपास रोडवर बोलावण्यात आलं. तिथे गेल्यावर नराधमांनी त्याला बेदम मारहाण करत डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे.

ही घटना रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी माजलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. धारूर तालुक्यातील चिखली येथील मुळ रहिवासी असलेला अनिल सर्जेराव शेंडगे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या धारूर येथील शाळेतील शिपाई पदावर कार्यरत होता.

तसेच माजलगाव येथील मंजरथ रोड शिक्षक कॉलनी येथे तो राहत होता. त्याच्या निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. क्रूरतेने हत्या केल्याने गावात देखील भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT