Solapur Crime News: माणुसकी ओशाळली! घरमालकाचा नकार, मृत्रदेह रात्रभर पावसात भिजला; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Crime News: पावसात भीजत असलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेत.
Solapur Crime News
Solapur Crime NewsSaam TV
Published On

Solapur Crime: अमावस्या असल्याने घरमालकाने भाडेकरूचा मृतदेह घरात घेण्यास नकार दिल्याने भाडेकरूचा मृतदेह तसाच रात्रभर पावसात भिजत असल्याचे फोटो काल सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. गोदुताई विडी घरकुलमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोलापुरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आल्याने नागरीकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Crime News)

सोलापूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या गोदुताई विडी घरकुल परिसरात वास्तव्यास असलेल्या एका गरीब कुटुंबाला घरमालकाकडून अत्यंत हीन वागणूक मिळाली आहे. शंकर यल्लप्पा मुटकिरी (वय ४९ रा,गोदुताई विडी घरकुल)असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. अमावस्या असल्याने घर मालकाने मृतदेह घरात आणू दिला नाही.

Solapur Crime News
Ajit Pawar on Rain : अद्याप शेतकऱ्यांना मदत नाही ; सरकारने तातडीने मदत करावी !

मृत्य व्यक्तीच्या आई नागमणी मुटकिरी या वृद्ध आणि भाऊ अनिल मुटकिरी हा अपंग असल्याने अंत्यसंस्कार करणे अवघड झाले होते. सोमवारी रात्री नातेवाईकांनी देखील पाठ दाखवल्याने वृद्ध आई आणि अपंग भावावर मृतदेह तसाच रात्रभर घराबाहेर ठेवण्याची वाईट वेळ आली. याचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित होताच गोदुताई विडी घरकुल परिसरात सामाजिक कार्य करणाऱ्या वसीम मुल्ला, विल्यम ससाणे आणि इतर नातेवाईकांनी मंगळवारी अंत्यविधी केला. मंगळवारी दिवसभर मनाला हेलावून टाकणारे मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर फिरत होते.

शंकर मुटकीरी शिलाई कामगार म्हणून काम करत होता. तो गोदुताई विडी घरकुल परिसरात भाड्याने राहत होता. काही दिवसांपूर्वीच शंकरला अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर तेथील नागरिकांनी रुग्णवाहिका बोलवून सिव्हिल रुग्णालयात त्याला दाखल केले. सोमवारी दुपारी शंकरचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

Solapur Crime News
Nashik Crime News: उंटवाडीत 2 गट भिडले, एकावर तलवारीने वार; धक्कादायक प्रकार मोबाईल कॅमेरात कैद

ही बाब ससाणे आणि वसीम यांना कळताच त्यांनी सिव्हिलमध्ये जाऊन डिस्चार्जची प्रक्रिया पूर्ण केली. शंकरच्या एका नातेवाईकाकडे मृतदेह सोपवला. मृतदेह घरासमोर आणल्यानंतर घरमालकाने घरात मृतदेह घेऊन जाण्यास परवानगी दिली नाही. अमावस्या आहे. आम्हाला चालत नाही, अशी आडकाठी घेतल्यामुळे मृतदेह घराबाहेरच ठेवावा लागला. सोमवारी रात्रभर पावसात भिजत मृतदेह बाहेर ठेवण्यात आला होता. शंकरच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनी पुढाकार घेणे गरजेचे होते. परंतु, नातेवाईकांकडून कुणीच पुढाकार घेतला नाही. त्यामुळे विल्यम ससाणे आणि वसीम मुल्ला यांनी मंगळवारी गोंदुताई विडी घरकुल गृहनिर्माण सोसायटीच्या निधीतून शंकरवर अंत्यसंस्कार केले.

घराबाहेर भिजत असलेल्या मृतदेहाचे फोटो वायरल

मंगळवारी सकाळी पावसात भिजत असलेल्या पार्थिवाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर गोदुताई विडी गृहनिर्माण संस्थेचे विल्यम ससाणे आणि वसीम मुल्ला यांनी नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. अंत्यसंस्काराला मोजून पाच ते सहा नातेवाईक हजर झाले. त्यानंतर ससाणे आणि वसीम मुल्ला यांनी अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतली.

मनाला हेलावून टाकणारे दृश्य

शंकरचा भाऊ अनिल हा ४५ वर्षांचा असून तो अपंग आहे. आई नागमणी या ६५ वर्षांच्या आहेत. शंकर हा घरात एकमेव कमावणारा होता. शंकरच्या मृत्यूनंतर भाऊ अन् आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.गरिब लोकांना किती खालच्या स्तरापर्यंत दुःख सहन करावे लागते याचं ज्वलंत उदाहरण सोलापुरात पाहायला मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com